महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gram Panchayat Election: ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 4 ऑगस्ट रोजी होणार मतदान - Code of Conduct Applied

पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 62 तालुक्यांतील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ( Gram Panchayat General Elections ) 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
General Election

By

Published : Jun 29, 2022, 5:00 PM IST

मुंबई -पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 62 तालुक्यांतील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ( Gram Panchayat General Elections ) 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू ( Code of Conduct Applied ) झाली आहे. 5 ऑगस्ट 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिली.

सर्वोच्च न्यायालयाने 17 मे 2022 रोजी दिलेल्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 62 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर ( Election program announced ) केला असल्याचे श्री. मदान यांनी सांगितले आहे. त्यानुसार, संबंधित तहसीलदार 5 जुलै 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 12 ते 19 जुलै 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 16 आणि 17 जुलै 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत येणारे असेही श्री. मदान यांनी सांगितले. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 जुलै 2022 रोजी होईल. त्याशिवाय, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 22 जुलै 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर मतदान 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. तर, मतमोजणी 5 ऑगस्ट 2022 रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या खालील प्रमाणे -

नाशिक: बागलाण- 13, निफाड- 1, सिन्नर- 2, येवला- 4, चांदवड- 1, देवळा- 13 आणि नांदगाव- 6.

धुळे:धुळे- 2, साक्री- 49 आणि शिंदखेडा- 1.

जळगाव: रावेर- 12, अमळनेर- 1, एरंडोल- 2, पारोळा- 3 आणि चाळीसगाव- 6.

अहमदनगर: अहमदनगर- 3, श्रीगोंदा- 2, कर्जत- 3, शेवगाव- 1, राहुरी- 3 आणि संगमनेर- 3.

पुणे:हवेली- 5, शिरुर- 6, बारामती- 2, इंदापूर- 4 आणि पुरंदर- 2.

सोलापूर: सोलापूर- 2, बार्शी- 2, अक्कलकोट- 3, मोहोळ- 1, माढा- 2, करमाळा- 8, पंढरपूर- 2, माळशिरस- 1 आणि मंगळवेढा- 4.

सातारा: कराड- 9 आणि फलटण- 1.

सांगली: तासगाव- 1.

औरंगाबाद: औरंगाबाद- 1, पैठण- 7, गंगापूर- 2, वैजापूर- 2, खुलताबाद- 1, सिल्लोड- 3, जालना- 6, परतूर- 1, बदनापूर- 19 आणि मंठा- 2.

बीड:बीड- 3, गेवराई- 5 आणि अंबेजोगाई- 5.

लातूर:रेणापूर- 4, देवणी- 1 आणि शिरूर अनंतपाळ- 4.

उस्मानाबाद: तुळजापूर- 2, कळंब- 1, उमरगा- 5, लोहारा- 2 आणि वाशी- 1.

परभणी:सेलू- 3.

बुलढाणा: खामगाव- 2 आणि मलकापूर- 3.

एकूण-271.

हेही वाचा -SC On MVA Petition : महाविकास आघाडीचे पुढील भवितव्य सर्वोच्च न्यायालयात आज 5 वाजता होणार स्पष्ट

ABOUT THE AUTHOR

...view details