महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दहिसर जंबाे काेविड सेंटरमधील गॅस पाईपलाईन नुतनीकरण होणार  - bmc on dahisar covid center

दहिसर पश्चिम येथील कोविड जंबो फॅसिलीटी सेंटरमध्ये मेडिकल गॅस पाईपलाईन सिस्टीमचे आता नुतनीकरण करण्यात येणार आहे.

Dahisar Jumbo Covid Center
दहिसर जंबो कोविड सेंटर

By

Published : May 25, 2021, 6:28 PM IST

मुंबई -दहिसर पश्चिम येथील काेविड जंबाे फॅसिलीटी सेंटरमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा एकसमान रहावा यासाठी या सेंटरच्या मेडिकल गॅस पाईपलाईन सिस्टीमचे आता नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेला 1 काेटी 2 लाख 78 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या सिस्टीमचे नुतनीकरण झाल्यास व्हेंटिलेटरवर असलेल्या सर्व रुग्णांना समसमान ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य हाेईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा -लसीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी राज्याने ग्लोबल टेंडरला काढले, मात्र प्रतिसाद नाही - राजेश टोपे

मेडिकल गॅस पाईपलाईनची दुरुस्ती -

दहिसर येथील हे केंद्र सर्व सुविधांसह गेल्या जून 2020 पासून सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात तेव्हापासूनच मेडिकल गॅस पाईपलाईनसुद्धा कार्यान्वित करण्यात आली आहे. सद्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवर असणार्या रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत आहे. त्यामुळे विविध प्रकारचे व्हेंटिलेटर्स आणि त्याच्या विविध जाेडण्या असल्यामुळे आॅक्सिजनचा पुरेसा दाब एकसमान रहात नाही. तसेच ऑक्सिजनच्या विविध क्षमतेचे व्हेंटिलेटर असल्यामुळे ते आता 110 आयसीयु व्हेंटिलेटर क्षमतेचे करण्यात येणार आहेत. येथील गॅस पाईपलाईन सिस्टिमची रचना मे. एएए हेल्थकेअर कन्स्लटंट यांनी जुलै 2020 मध्ये केली असून तेच देखभाल करीत आहेत. 110 आयसीयु व्हेंटिलेटरना ऑक्सिजनचा पुरेसा दाब मिळण्यासाठी मेडिकल गॅस सिस्टिममध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्याबाबत सल्लागार कंपनीकडून अहवाल आला आहे. त्या अहवालानुसार या पाईपलाईनच्या सिस्टीमचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 काेटी 2 लाख 98 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

तिसर्या लाटेसाठी नुतनीकरण -

स्थायी समितीच्या उद्या हाेणार्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूरीसाठी आला आहे. सद्या कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात येत असली तरी तिसर्या लाटेची भिती लक्षात घेवून या सिस्टीमचे नुतनीकरण करण्याची गरज असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्या प्रस्तावाला समितीची मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -अन् रोहित पवार झाले सैराट..कोविड सेंटरमध्ये झिंगाटवर केला अफलातून डान्स

ABOUT THE AUTHOR

...view details