मुंबई - जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावरील गांधीनगर पुलावर पालिकेचा कचरा वाहक ट्रक सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उलटला. यामुळे पुलावरील एकेरी वाहतूक 2 तासांपेक्षा जास्त वेळ बंद होती. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
गांधीनगर पुलावर पालिकेचा कचरा वाहक ट्रक उलटला; वाहतूक विस्कळीत - jogeshvari
जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरून पवई, हिरानंदानी, साकिनाका, अंधेरी व नवी मुंबई ,मुलुंड, भांडूप, विक्रोळी आणि घाटकोपरकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनचालकांना पहाटेपासूनच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
पालिकेचा 12 टन कचरा भरलेला (MH 01 CR 3252 ) 10 चाकी ट्रक कांजूरमार्गे कचरा डेपोकडे जाताना उलटल्याने पुलावर आणि पुलाखालील रस्त्यावर सकाळी वाहतूक कोंडी झाली होती. जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरून पवई, हिरानंदानी, साकिनाका, अंधेरी व नवी मुंबई ,मुलुंड, भांडूप, विक्रोळी आणि घाटकोपरकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनचालकांना पहाटेपासूनच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
यावेळी सकाळी 7.25 वाजता वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी कलंडलेला ट्रक बाजूला केला. रस्त्यावर पडलेल्या ट्रकमधील कचरा जेसिबीच्या साहाय्याने दुसऱ्या कचरा वाहक ट्रकमध्ये भरून मार्गस्थ केला. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी हा रस्ता धुवून काढत मार्ग मोकळा केला. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. हा ट्रक नेमका कसा उलटला, यासंदर्भात अधिक तपास विक्रोळी वाहतूक विभाग करत आहे.