VIDEO : सांताक्रूझमधील एका मॉलमध्ये 'गरबा नाईट'चे आयोजन; आयोजकांवर गुन्हा दाखल - सांताक्रूझ गरबा नाईट बातमी
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे राज्य सरकारने गरब्यावर बंदी घातली आहे. मात्र, असे असताना मुंबईच्या सांताक्रूझ भागात असलेल्या हायलाईफ मॉलमध्ये शुक्रवारी रात्री गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई - राज्यात दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त गरब्याचे आयोजन करण्यात येते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. मात्र, असे असताना मुंबईच्या सांताक्रूझ भागात असलेल्या हायलाईफ मॉलमध्ये शुक्रवारी रात्री गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या कार्यक्रमात 150 पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असल्याची माहिती आहे. तसेच यावेळी कोरोनाचे नियमही पायदळी तुडवण्यात आले आहे. दरम्यान, सांताक्रुज पोलिसांनी गरबा नाईटच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.