महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात आता 'गाव तिथे काँग्रेस' अभियान

गाव तिथे काँग्रेस या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत गावपातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ४० हजार ग्राम काँग्रेस कमिट्यांची स्थापना करण्यात येणार आहे.

गाव तिथे काँग्रेस
गाव तिथे काँग्रेस

By

Published : Jan 15, 2020, 2:03 AM IST

मुंबई - राज्यात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ‘गाव तिथे काँग्रेस’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. आगामी तीन महिने चालणाऱ्या या अभियानाअंतर्गत राज्यभरात ४० हजार ग्राम काँग्रेस कमिट्यांची स्थापन केली जाणार आहे. अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी मुंबईत केली.

गाव तिथे काँग्रेस अभियानाची बैठक
टिळक भवन येथे मंगळवारी बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील ग्रामीण आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची, महिला काँग्रेस, एनएसयुआय, तसेच सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्षा व महिला, बालकल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, कार्याध्यक्ष बसवराज पाटील, मुझफ्फर हुसेन, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, प्रदेश सरचिटणीस माजी आ. मोहन जोशी, ऍड.गणेश पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख आदी उपस्थित होते.
गाव तिथे काँग्रेस अभियानाची बैठक

हेही वाचा -'सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत', म्हणून...

या बैठकांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि संघटनात्मक कार्याची माहिती घेतली. दरम्यान, गाव तिथे काँग्रेस या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत गावपातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ४० हजार ग्राम काँग्रेस कमिट्यांची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच, बुथ काँग्रेस कमिट्यांचे पुर्नगठण करण्यात येणार आहे. या अभियानाची जबाबदारी प्रदेश आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण ताकदीने हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले आहे.

हेही वाचा -'सावध राहा..परत बोलाल तर लोकं तांगडून मारतील'

ABOUT THE AUTHOR

...view details