मुंबई: चित्रपट निर्माता आणि निर्देशक संजय लीला भंसाली यांचा गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला ( Gangubai Kathiawadi movie controversy ) आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटा विरोधात सोमवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे संजय लीला भंसाली यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती जीएस पटेल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ बुधवारी (दि.23) सुनावणी होणार आहे.
कांग्रेसचे आमदार अमीन पटेल (Congress MLA Amin Patel ) यांनी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या विरोधात याचिका दाखल ( Petition filed against Gangubai Kathiawadi movie ) केली आहे. ही जनहित याचिका सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) दाखल करण्यात आली आहे. आलिया भट्ट ही गंगूबाई काठियावाडी चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाला विरोध करताना या चित्रपटाचे नाव बदलण्याची मांगणी केली जात आहे. काठियावाडी नाव असल्याने सदर शहराची प्रतिमा मलिन होणार असं आमदार पटेल यांनी म्हटले आहे. पटेल यांनी आरोप केला आहे की, कामाठीपुरा हा मोठा परिसर आहे त्यात फक्त एक, दोन गल्ली मध्ये रेड लाईट एरिया आहे. म्हणून संपूर्ण कामाठीपुराचा नाव खराब होणं हे योग्य नाही.
अलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून तिने गंगुबाईची भूमिका ( Alia Bhatt in role of Gangubai ) साकारली आहे. परंतु जर आमदार अमीन पटेल राज्य शासनाकडे हे प्रकरण नेलं तर चाहत्यांनी निराशा होईल. चित्रपत्रटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. त्यावेळी सुध्दा या चित्रपटाला विरोध करण्यात आला होता. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून येत्या 25 तारखेला रिलीज होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. फिल्म निर्माता संजय लीला भंसाली याचा हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. चित्रपटाच्या विरोधातील जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टात बुधवारी (दि.23) सुनावणी होणार आहे.