महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गँगस्टर एजाज लकडावालासह सलीम महाराजला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याच्यासह त्याचा खास साथीदार सलीम महाराज अर्फ बटरफ्लाय याला पोलिसांनी मंगळवारी स्थानिक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्या दोघांना ५ फेब्रुबारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

gangsters-ejaz-lakdawala-and-salim-maharaj-were-sent-to-police-custody-till-february-5
गँगस्टर एजाज लकडावाला व सलीम महाराजला 5 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी

By

Published : Jan 28, 2020, 7:01 PM IST

मुंबई - कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याच्यासह त्याचा खास साथीदार सलीम महाराज उर्फ बटरफ्लाय या दोघांना मंगळवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपीना 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सोमवारी मुंबईतील भायखळा परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी नोहेबर 2019ला धमकी दिली होती. ज्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर एजाज लकडावाला याला खंडणी प्रकरणात झालेली ही तिसरी अटक आहे.

गँगस्टर एजाज लकडावाला व सलीम महाराजला 5 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी

एजाज लकडावाला याच्यासाठी खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक व व्यापाऱ्यांना धमकी देण्यासाठी मदत करणाऱ्या सलीम महाराज उर्फ बटरफ्लाय या आरोपीलाही सोमवारी अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले. यानंतर न्यायालयाने ५ फेब्रुवारी पर्यंत त्यालची रवानगी पोलीस कोठडीत केली. मुंबई शहरात दुबई मार्गे सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीपैकी एक मोठी टोळी सलीम महाराज चालवत होता. एजाज लकडावाला याला मुंबईतील तस्करी करणाऱ्या टोळीपैकी व्यापाऱ्यांची रेकी करून संपूर्ण माहिती देत होता. यासाठी एजाज लकडावाला याने त्याची माणसे सुद्धा शहरातील वेगवेगळ्या परिसरात नेमलेली होती.

खंडणी विरोधी पथकाकडून येत्या काही दिवसात एजाज लकडावाला व सलीम सुपारी या दोघांसाठी काम करणाऱ्या काही जाणाना काही दिवसात अटक करण्यात येणार आहे. एजाज लकडावाला याच्या अटकेनंतर सलीम महाराज याची अटक महत्वाची मानली जात असून त्याच्या पोलीस चौखशीतून मुंबईतील खंडणी मगणाऱ्या टोळीच्या मुसक्या आणखीन आवळण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details