मुंबई :गँगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा मोहम्मद सलीम मोहम्मद इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट ( Gangster Chhota Shakeels brother in law Salim Fruits ) याला एनआयएच्या कारवाईमधून वाचवण्यासाठी ( amount sought to escape NIA action ) 50 लाखाची मागणी करून फसवणूक ( 50 lakh fraud with Salim Fruit ) करण्यात आली. याप्र्करणी चार आरोपींना दिल्ली एनआयएने अटक केली ( NIA arrested accused in financial fraud ) असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या सर्व चारही आरोपींना मुंबई पोलिसांच्या ( Mumbai police arrested salim fruits fraud accused ) ताब्यात देण्यात येणार आहे.
फसवणूक करणारे आरोपी अटकेत-मिळालेल्या माहितीनुसार सलीम फ्रुट याच्यावर गेल्या एक महिन्यांपासून एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सलीम फ्रुट हा एनआयएच्या रडारवर आहे. अनेक वेळा छापेमारी करत त्याला चौकशीला देखील बोलवले होते. या सर्व चौकशीमधून वाचवण्याकरिता दिल्लीतील 4 व्यक्तींनी 50 लाख रुपये मागितले होते. त्यानुसार त्यांना रक्कम देखील देण्यात आली होती, अशी माहिती एनआयएला तपासात मिळाल्यानंतर या चारही आरोपींना दिल्लीत अटक करण्यात आली आहे.
17 ऑगस्टपर्यंतची एनआयएची कोठडी -विशाल देवराज सिंह उर्फ विशाल काळे, जाफर उस्मानी आणि पवन मूत्रेजा अशी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दिल्ली येथून या संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून एनआयएने त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सलीम फ्रूट याला 4 ऑगस्ट रोजी एनआयएने अटक केली असून त्याला 17 ऑगस्टपर्यंतची एनआयएची कोठडी सुनावण्यात आली आहे. सलीम याला अटक होण्याआधी विशाल याने दिल्लीतील एका बड्या नेत्याची आणि आपली ओळख असून एनआयच्या चौकशीतून वाचण्यासाठी 50 लाख रूपये द्यावे लागतील असे सांगितले.