महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganeshotsav मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सव धुमधडाक्यात, तयारी सुरू - Ganeshotsav is celebrated with pomp

मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोनाचा Covid-19 प्रसार आहे. या प्रसारामुळे गेले दोन वर्षे गणेशोत्सव निर्बंधांमध्ये Restrictions on Ganeshotsav साजरी करण्यात आला आहे. मात्र, यावर्षी मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सव Ganeshotsav मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. यंदा निर्बंध हटवण्यात आल्याने गणेशोत्सव Ganeshotsav मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे.

ganeshotsav
गणेशोत्सव

By

Published : Aug 18, 2022, 6:29 PM IST

मुंबईमुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सव Ganeshotsav मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र मागील दोन वर्षे कोरोनाचा प्रसार असल्याने या सणावर निर्बंध आले होते. यंदा निर्बंध हटवण्यात आल्याने गणेशोत्सव Ganeshotsav मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. गणेश विसर्जन Ganesh Visarjan करताना कोणत्याही अडचणी होऊ नये यासाठी पालिकेकडून विसर्जन स्थळी सोयी सुविधा दिल्या जातात. यासाठी पालिकेने तयारी सुरु केली आहे.

मुंबईत गणेशोत्सवमुंबईमध्ये सुमारे २ लाखाहून अधिक घरगुती मुर्त्या बसवल्या जातात. मुंबईमध्ये १० हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे 10 thousand public Ganeshotsav mandals in Mumbai आहेत. मुंबईत दीड, पाच, सात आणि अकरा दिवसाच्या गणेश मुर्त्यांची प्रतिष्ठापना केली जाते. यासाठी मुंबई महापालिकेकडून गणेश आगमनापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तसेच नैसर्गिक विसर्जनस्थळी सुविधा उपलब्ध करून देणे, गणेश भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आदी कामे महापालिकेकडून केली जातात. त्यासाठी पालिकेने तयारी सुरु केली आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये नैसर्गिक ठिकाणी १ लाख ६४ हजार ७६१ तर कृत्रिम ठिकाणी ७९ हजार १२९ गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले आहे.


विसर्जनासाठी कृत्रिम तलाव मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोनाचा Covid-19 प्रसार आहे. या प्रसारामुळे गेले दोन वर्षे गणेशोत्सव निर्बंधांमध्ये Restrictions on Ganeshotsav साजरी करण्यात आला आहे. यंदा कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरी Ganeshotsav is celebrated with pomp करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात मुंबईकरांनी कृत्रिम तलावाला चांगला प्रतिसाद दिला आहे. यंदाही सुमारे १८० कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या ठिकाणी पालिकेने नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांकडे गणेशमूर्ती सुपूर्द केल्यावर संबंधित कर्मचारी गणेशमूर्त्यांचे विसर्जन करणार आहेत.


नैसर्गिक विसर्जन स्थळावरही सुविधाकोरोना निर्बंध हटवल्याने काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी २० फुटाहून अधिक उंचीच्या मुर्त्याची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या मुर्त्यांचे विसर्जन ७३ नैसर्गिक स्थळी केले जाणार आहे. त्यासाठी गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, दादर चौपाटी आदी ७३ स्थळी वाहने रेतीमध्ये अडकू नये म्हणून स्‍टील प्‍लेटस लावल्या जाणार आहेत. नियंत्रण कक्ष, ६०० हुन अधिक जीवरक्षक (लाईफगार्ड), मोटरबोट, प्रथमोपचार केंद्र, रुग्‍णवाहिका, स्‍वागत कक्ष, तात्‍पुरती शौचालये, निर्माल्‍य कलश, निर्माल्‍य वाहन/डंपर, फ्लड लाईट, सर्च लाईट, निरीक्षण मनोरे, जर्मन तराफा, ६ हजाराहून अधिक कामगार, अडीच हजारहून अधिक अ‍धिकारी आदींची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे अशी माहिती पालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली.


गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवणारदरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात. गणेश आगमन आणि विसर्जनादरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भक्तांना अडचणीला सामोरे जावे लागते. तसेच मूर्तीला धोका पोहचण्याची शक्यता असते. गणेशोत्सव अवघ्या वीस दिवसांवर आल्यामुळे पालिकेने रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी तीन प्रकारचे नवे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ‘जिओ पॉलिमर’, ‘फास्ट क्युलिंग काँक्रिट’ आणि ‘रॅपिड स्पिड असफाल्ट’ ही टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे. यासाठी मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरासाठी एकूण सात कोटींचा निविदा काढण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.


विसर्जनावेळी या दिवशी समुद्राला भरतीदीड दिवसाच्या गणेश विसर्जनादरम्यान १ सप्टेंबरला दुपारी २.४६ वाजता ४.०२ मीटरची तर ९ सप्टेंबरला दहाव्या दिवशी सकाळी ११.१६ वाजता, तर १० सप्टेंबरला सकाळी ११.५५ वाजता ४.६८ मीटरची समुद्राला भरती आहे. समुद्रात यावेळी ४ फुटाहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार असल्याने भाविकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.


१३ पुलांवर काळजी घ्या मुंबईत अनेक जुने धोकादायक पूल असून ते धोकादायक झाले आहेत. अंधेरीत ३ जुलै २०१८ रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेने मुंबईतील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण केले. यात धोकादायक पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहेत. गणेशोत्सवात धोकादायक पुलांवर गर्दी होऊन दुर्घटना होऊ नये यासाठी पालिकेने धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे. पालिका आणि पोलिसांनी दिलेल्या सुचनेनुसारच या पुलांवरून ये-जा करावी असे निर्देशही पालिकेने दिले आहेत. पुलावर गर्दी करू नये आणि एका वेळी भाविकांचे व वाहनांचा मिळून १६ टनांपेक्षा जादा भार पडणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहनही पालिकेने केले आहे.


धोकादायक पुलांची यादी -
- घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रीज
- करीरोड रेल्वे ओव्हर ब्रीज
- आर्थर रोड-चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रीज ( १६ टन क्षमता)
- भायखळा रेल्वे ओव्हर ब्रीज मांडलिक पूल ( १६ टन क्षमता)
- मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रीज
- सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रीज
- फ्रेंच रेल्वे ओव्हर ब्रीज
- केनडी रेल्वे ओव्हर ब्रीज ( ग्रँटरोड, चनीॅरोडच्या मध्ये)
- फॉकलँड रेल्वे ओव्हर ब्रीज ( ग्रँटरोड व मुंबई सेंट्रल दरम्यान)
- बेलासीस मुंबई सेंट्रल जवळील ब्रीज
- महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज
- प्रभादेवी-कॅरोल रेल्वे ओव्हर ब्रीज
- दादर - टिळक रेल्वे ओव्हर ब्रीज

हेही वाचा Maharashtra Monsoon Session मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ

ABOUT THE AUTHOR

...view details