मुंबईअवघ्या एक दिवसांवर आलेल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या तयारीला आता जोरात सुरुवात झाली arrival of beloved Ganaraya आहे. मागील दोन वर्षांपासून गणेश भक्त ज्या दिवसाची वाट बघत होते, तो दिवस उद्यावर येऊन ठेपला आहे. या दिवसाच्या तयारीसाठी मुंबईतील दादर, क्रोफॉर्ड मार्केट अशा ठिकाणी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. बाप्पासाठी आरास बनवताना फुलांच्या मखराला high demand fresh flower Makhara यंदा गणेश भक्तांची पसंती मोठ्याप्रमाणात दिसत आहे.
विविधरंगी ताज्या फुलांपासून बनवितात मखरGaneshotsav 2022गणरायाच्या आरास सजावटीसाठीच्या for Bappas Aaras in mumbai विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या असल्या, तरी यंदा विशेष करून दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी आरास करताना भाविक फुलांपासून बनविलेल्या आरासला जास्त प्राधान्य देत आहेत. दादर मधील फुल बाजारात विविध प्रकारच्या, विविधरंगी फुलांपासून बनविलेल्या मखराला मोठी मागणी आहे. फुलांची आरास करण्यासाठी लागणार्या विविध फुले इथे उपलब्ध आहेत. फुलांच्या सजावटीसाठी विविध साहित्य खरेदीसाठी दादर बाजारपेठेतील रानडे रस्ता, आयडियल गल्ली, फूल मार्केट आज सकाळपासून नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले आहे.