मुंबई :घरात आलेल्या आमंत्रण आणि लग्न पत्रिका टाकून न देता आपल्याला त्या आणून द्यावा. त्यापासून पुढील वर्षासाठी आपण बाप्पाची मूर्ती तयार करू (Ganesha Idol Making old wedding card) असा सुप्त उपक्रम अंधेरीच्या वरसावा परिसरात असलेल्या स्वप्नाक्षय मित्र मंडळाकडून सुरू करण्यात आला आहे. त्याला मुंबईकरही चांगली साथ देत आहेत. (Ganesha Idol Making)
Ganesha Idol Making: घरातल्या जुन्या आमंत्रण आणि लग्न पत्रिकांपासून गणेशमूर्ती निर्मितीचा उपक्रम - Ganesha Idol Making
घरात आलेल्या आमंत्रण आणि लग्न पत्रिका टाकून न देता आपल्याला त्या आणून द्यावा. त्यापासून पुढील वर्षासाठी आपण बाप्पाची मूर्ती तयार करू (Ganesha Idol Making old wedding card) असा सुप्त उपक्रम अंधेरीच्या वरसावा परिसरात असलेल्या स्वप्नाक्षय मित्र मंडळाकडून सुरू करण्यात आला आहे. त्याला मुंबईकरही चांगली साथ देत आहेत. (Ganesha Idol Making)
पत्रिकांपासून गणेशमूर्तीची निर्मिती-स्वप्नाक्षय मित्र मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संकल्पना तयार केली आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशी सर्वच नागरिकाच्या घरात आमंत्रण पत्रिका आणि लग्नपत्रिका येत असतात. मात्र सोहळा पार पडल्यानंतर त्यांचे काय करायचे असा सवाल आपल्या समोर उभा राहतो. यावर उपाय म्हणून आम्ही यावर्षी सर्व मुंबईकरांना आवाहन केलं आहे की, त्यांनी आपल्या घरातील सर्व पत्रिका चाचा नेहरू उद्यानात असलेल्या ड्रममध्ये आणून ठेवाव्यात. जेणेकरून त्या पत्रिकांचा लगदा तयार करून त्यापासून पर्यावरण पूरक बाप्पाची मूर्ती तयार करता येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र आंबेरकर यांनी दिली आहे. मंडळाने सुरू केलेल्या उपक्रमाला मुंबईकर देखील प्रतिसाद देत असून आतापर्यंत ५०० पत्रिका जमा झाल्या आहेत. ज्याचा वापर बाप्पाची मूर्ती तयार करायला होणार आहे. यापासून ८ ते १० फुटी उंचीची आणि १०० किलो वजनापर्यंतची मूर्ती तयार करता येऊ शकते. स्वप्नाक्षय मित्र मंडळाने या आधीही पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावरच भर दिला आहे. यावर्षीही महानगर पालिके कडून पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेत मंडळाला तिसरे पारितोषिक मिळेल आहे.