महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganesh Visarjan 2022 बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार - Strict security of Mumbai Police

Ganesh Visarjan 2022 दिल्ली, Ganeshotsav 2022 मुंबईसह देशातील काही राज्यांना मिळालेल्या धमक्या या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून Mumbai Police अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

Ganesh Visarjan 2022
Ganesh Visarjan 2022

By

Published : Sep 8, 2022, 10:52 PM IST

मुंबईदिल्ली, Ganeshotsav 2022 मुंबईसह देशातील काही राज्यांना मिळालेल्या धमक्या या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून Mumbai Police अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईत उद्या अनंत चतुर्दशी Ganesh Visarjan 2022 निमित्त मुंबई पोलिसांचे 3200 पोलीस अधिकारी आणि 15 हजार 500 पोलीस कर्मचारी मुंबईच्या रस्त्यांवर Strict security of Mumbai Police तैनात असणार आहेत.

पोलिसांचा तगडा बंदोबस्तउद्या मुंबईत अनंत चतुर्दशी निमित्त मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाट्यांवर बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होते. तसेच अनेक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत देखील अनेक भाविक सामील झालेले असतात. Ganesh Visarjan यादरम्यान अनंत चतुर्दशी दिवशी उसळणाऱ्या गर्दीचा फायदा समाजकंटक घेऊ नयेत, म्हणून मुंबई पोलिसांनी आपली कंबर कसली आहे. मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त उद्या मुंबईत असणार आहे.

पोलीस सूत्रांची माहितीअनंत चतुर्दशीसाठी मुंबईत जवळपास 3200 पोलीस अधिकारी, 15500 पोलीस कर्मचारी, 8 एसआरपीएफच्या कंपनी एक रॅपिड ऍक्शन फोर्सची तुकडी आणि एक फोर्स वनची तुकडी तैनात असणार आहे. त्याचप्रमाणे 750 होमगार्ड 250 ट्रेनिंग देखील मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी उद्या मुंबईच्या रस्त्यावर उतरणार आहे. त्याचप्रमाणे साध्या वेशातील पोलीस सुद्धा उद्या कार्यरत असणार आहेत. दहशतवादी विरोधी पथकाचे पथक देखील गुप्तपणे सक्रिय असणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details