महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganesh Immersion :मुंबईत पहाटे ६ वाजेपर्यंत ३७८२१ गणेशमूर्तींचे विसर्जन - Ganesha idols in Mumbai

मुंबईत काल अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन (Ganesh Idol Immersion) करण्यास सुरुवात करण्यात आली. मुंबईत गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कृत्रिम तलाव बनवले आहेत. मुंबईमध्ये दहीहंडी नंतर गणेशोत्सव सण निर्बधमुक्त (Unrestricted celebration of Ganeshotsav) वातावरणात साजरा केला जात आहे. विसर्जनाच्या दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त.मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर (Mumbai Girgaon Chowpati )गणेश मूर्तींच्या विसर्जन सोहळ्यासाठी हजारो लोक जमले होते. पहाटे ६ वाजेपर्यंत ३७८२१ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

Ganesh Immersion in Mumbai
मुंबईत गणेश विसर्जन

By

Published : Sep 10, 2022, 10:06 AM IST

मुंबई -मुंबईत काल अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन (Ganesh Idol Immersion) करण्यास सुरुवात करण्यात आली. आज शनिवारी सकाळपर्यंत विसर्जन सुरू होते. पहाटे ६ वाजेपर्यंत ३७८२१ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी ९७५० मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी BMCने नागरिकांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे कृत्रिम तलाव किंवा तलावांमध्ये विसर्जन करण्यास सांगितले होते. विसर्जनाच्या दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त आणि पालिकेने केलेल्या उपाययोजनामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने (BMC Emergency Management) दिली.

३७८२१ मुर्त्यांचे विसर्जन -मुंबईमध्ये दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार असल्याने सर्व सण निर्बंधांमध्ये साजरे करावे लागले होते. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने यंदा निर्बंध हटवण्यात आले आहेत. मुंबईमध्ये दहीहंडी नंतर गणेशोत्सव सण निर्बधमुक्त वातावरणात साजरा केला जात आहे. मुंबईत काल शुक्रवारी ९ सप्टेंबरला गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. पहाटे ६ वाजेपर्यंत १० दिवसांच्या घरगुती सार्वजनिक ६३४३, घरगुती ३११७०, गौरी ३८० अशा एकूण ३७८२१ मुर्त्यांचे विसर्जन नैसर्गिक स्त्रोत्रात करण्यात आले.

त्यापैकी कृत्रिम तलावात सार्वजनिक ७९५, घरगुती ८८७३, गौरी ८२ अशा एकूण ९७५० मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन सोहळ्यासाठी हजारो लोक जमले होते. आतापर्यंत विसर्जन मिरवणुकीत कोणतीही अनुचित घटना घडली नाही, शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जुहू आणि गिरगावमधील विसर्जन स्थळे आणि समुद्रकिनारे यांच्यावर सुरक्षा मजबूत केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details