मुंबई- विक्रोळीच्या सार्वजनिक उत्सव समिती गणेश मैदान या मंडळाने यावर्षी कैलास पर्वतावरील मानस सरोवराचा देखावा साकारला आहे. मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. मंडळाने सिंहासनावर आरुढ 11 फूट उंच बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या वर्षी केली आहे.
विक्रोळीच्या सार्वजनिक उत्सव समिती गणेश मैदान मंडळ हेही वाचा- मुंबईत अतिवृष्टीमुळे गणपती मंडपात शिरले पाणी; कार्यकर्त्यांची धावपळ
मुंबईच्या गणेशोत्सवात देखावे निर्माण करून सामाजिक संदेश देण्याची परंपरा आहे. तसेच अनेकांना धार्मिक पर्यटनस्थळी जाता येत नाही. त्यामुळे त्यांना ते धार्मिक स्थळ कसे आहे, हे पाहता यावे असेही मंडळांचा प्रयत्न असतो. तो पाहता यावा यासाठी तिबेटच्या पठारावर ६ हजार ३८ मीटर उंचीवर असलेल्या या कैलास मानसरोवर पर्वताचा देखावा साकारला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे सिंधू, ब्रह्मपुत्रा, सतलज अशा महत्त्वाच्या नद्यांचा पर्वतावरून उगम दाखवण्यात आला आहे. शंकराच्या मूर्तीसह पर्वतामध्ये बाप्पाची 11 फुटांची सुबक मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.
पर्वतामध्ये असलेल्या थंड वातावरणाची निर्मीती इथे करण्यात आली आहे. भव्य देखावा पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. कैलास पर्वतावरील मानसरोवर तलाव म्हणजे शुद्धतेचे रुप आहे. असा हा कैलास पर्वत मानवजातीसाठी अतिशय पवित्र स्थळ आहे. भारतीय अध्यात्मात कैलास पर्वताचे स्थान अव्दितीय आहे. आम्ही दरवर्षी काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच आम्ही सामाजिक भान राखत सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणच्या पूरग्रस्तांना मदत केली आहे, असे मंडळाचे सचिव विजय सोनमळे यांनी सांगितले.