नवी मुंबई - मागील काही दिवसांपासून नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई ऐरोली मतदार संघाचे आमदारांनी शहरातील नागरिकांच्या सोईच्या अनुषंगाने नवी मुंबई मनपाकडे काही मागण्या केल्या होत्या. या मागण्या पूर्ण करण्यासाठी नवी मुंबई मनपा सकारात्मक पाऊले उचलत असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना आमदार नाईक म्हणाले, 'प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन कामे करावीत'. 'सद्यस्थितीत प्रशासनाच्या माध्यमातून होत असलेल्या कामात कुठे कमतरता आहे, तसेच त्यांना माहीत नसलेल्या कामांची जाणीव करून देण्यासाठी आम्ही दर आठवड्याला पालिका मुख्यालयात येऊन आयुक्तांची भेट घेतो'. अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.