महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganapati Bappas arrival in marathi serials मराठी मालिकांमध्ये गणपती बाप्पाचे थाटामाटात आगमन - marathi serials of colors

ganeshotsav 2022 दरवर्षी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात होते. मराठी मालिकांमध्येही बाप्पा विराजमान होतात. यावर्षी मराठी मालिकांमधून मोठ्या जोमाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. Ganapati Bappas arrival in marathi serials

Ganapati Bappas arrival in marathi serials
मराठी मालिकांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन

By

Published : Aug 31, 2022, 5:54 PM IST

Updated : Aug 31, 2022, 5:59 PM IST

मुंबई दरवर्षी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात होते.मराठी मालिकांमध्येही बाप्पा विराजमान होताना marathi serials of colors दिसतात. गेली दोन वर्षे थोडी कष्टात गेली, परंतु यावर्षी मराठी वाहिनीच्या मालिकांमधून मोठ्या जोमाने गणेशोत्सव साजरा केला जाणार Ganapati Bappas arrival in marathi serials आहे. भाग्य दिले तू मला, राजा रानीची गं जोडी, जीव माझा गुंतला, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकांमध्ये गणपती बाप्पाचे थाटामाटात आगमन होणार आहे.

मराठी मालिकांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन


आता सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाची तयारी मोठ्या उत्साहात, थाटामाटात सुरू आहे. आतुरतेने सगळेच श्री गणेश आगमनाची वाट बघत आहेत. सजावटीची तयारी, रोषणाई, बाप्पासाठी गोडधोड पदार्थ सगळ्याची तयारी सुरु झाली आहे. सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात सूरवीर गणरायासाठी सुरेल गाणी सादर करणार आहेत.

मराठी मालिकांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन


भाग्य दिले तू मला मालिकेत रत्नमाला मोहितेंच्या घरी बाप्पाचे आगमन होणार आहे. रत्नमाला यांना बाप्पाचा संकेत मिळणार आहे की, कावेरी राजसाठी योग्य आहे. कावेरी, राज आणि घरातील सगळे मिळून सजावटीची तयार करताना दिसणार आहेत. रत्नमाला, कावेरी खास बाप्पासाठी मोदक बनवणार आहेत.

मराठी मालिकांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन


जीव माझा गुंतला मालिकेत खानविलकरांच्या घरात गणरायाचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन होणार आहे. सगळे मिळून बाप्पाची पूजा करणार आहेत, नैवेद्य दाखवला जाणार आहे. मल्हार - अंतरा मिळून आरती करणार आहेत. पण, याच दरम्यान घरात मेघ देखील घरात येणार आहे. आता मेघच्या येण्याने कोणते संकट येईल हे कळेलच.

मराठी मालिकांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन गणपती बाप्पाचे थाटामाटात आगमन


सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत लतिका आणि अभि मिळून गणरायाची स्थापना करणार आहेत. अभिलाषा अभिमन्यूच्या विरोधात काही तरी कट कारस्थान करताना दिसणार आहे. आता हे आलेलं विघ्न कसं दूर होईल, काय आहे नक्की अभिलाषाच्या मनामध्ये, हे मालिकेमध्ये बघायला मिळेल. मराठी वाहिनीच्या मालिकांमधून गणपती विशेष सप्ताह बघायला मिळणार आहे. Ganapati Bappas arrival in marathi serials

मराठी मालिकांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन

हेही वाचा4 Blind Men एक हत्ती आणि चार आंधळे या प्रसिद्ध बोधकथेवर आधारित मराठी चित्रपट

Last Updated : Aug 31, 2022, 5:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details