मुंबई - गडचिरोलीची नक्षलवादी सत्यनारायण रानीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाकडून आज शुक्रवार (दि. 15 जुलै)रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे. ( Accused in Gadchiroli Naxal attack granted bail ) सत्यनारायण यांच्या पत्नी वयोवृद्ध रानी सध्या दिर्घ आजारानं ग्रस्त आहेत. सत्यनारायण हा गडचिरोली मध्ये 1 मे रोजी झालेल्या हल्यातील मुख्य आरोपी असून जहरी नक्षली निर्मला उपगांतीचा पती आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला - 1 मे रोजी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडून आणला होता. या स्फोटात 16 जवान शहीद झाले होते. त्यानंतर या प्रकाराचा तपास (NIA)ला देण्यात आल्यानंतर या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टात हजर करण्यात आल्यापासून हे सर्व आरोपी सध्या अडथरूड जेलमधील न्यायालयीन कोठडीत होते. हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेले सत्यनारायण रानी आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला - या प्रकरणातील आरोपी नक्षलवादी निर्मला कुमारी उप्पुगंती यांना कॅन्सर आहे. या प्रकरणात आरोपी असलेले निर्मला कुमार यांचे पती सत्यनारायण राणी हे देखील आर्थररोड जेलमध्ये आहेत. त्यांना पंधरा दिवसातून एक दिवस अर्धा तास भेटण्याची मुभा देण्यात यावी साठी देखील सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाने त्याआधारावर भेटण्याची परवानगी दिली होती.
शांती अवेदना सदन या धर्मशाळा केंद्रात हलवण्यात आले - 2019 च्या गडचिरोली बॉम्बस्फोटात अटक करण्यात आलेल्या कथित नक्षलवादी निर्मला कुमारी उप्पुगंती यांच्या पतीला एका विशेष राष्ट्रीय तपास संस्थेने NIA पतीला पंधरवड्यातून एकदा 30 मिनिटांसाठी भेटण्याची परवानगी दिली होती. याच प्रकरणात निर्मला यांचे पती सत्यनारायण राणी हे देखील आर्थर रोड तुरुंगात आहेत. (2021)मध्ये कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यामुळे निर्मला दीर्घ आजारी असल्याने तिला शांती अवेदना सदन या धर्मशाळा केंद्रात हलवण्यात आले आहे.