महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

KK Funeral : गायक केके अनंतात विलीन, वर्सोवा येथील स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार - Funeral at KK in Versova Cemetery

प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुनथ उर्फ केके यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी वर्सोवा येथील पार्थ प्लाझा येथील घरी आणण्यात आले. त्यांनतर त्यांच्या पार्थिवावर वर्सोवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Krishnakumar Kunnath funeral
गायक केके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

By

Published : Jun 2, 2022, 12:28 PM IST

Updated : Jun 2, 2022, 4:18 PM IST

मुंबई - प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुनथ उर्फ केके यांचेमंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी वर्सोवा येथील पार्थ प्लाझा येथील घरी आणण्यात आले. त्यांनतर त्यांच्या पार्थिवावर वर्सोवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. येथे त्यांच्या मुलाने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी केके अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या.

गायक केके अनंतात विलीन

वर्सोवातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार -प्रसिद्ध गायक केके उर्फ कृष्णकुमारकुन्नथ ( Krishnakumar Kunnath ) यांचे अचानक कोलकातामध्ये निधन झाले. कोलकात्याच्या नजरुल मंच ऑडिटोरियममध्ये परफॉर्मन्स करताना असताना अचानक त्यांची तब्येत ढासळली. तब्येत ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रस्त्यातच त्यांना मृत्यूने गाठले. त्यानंतर आता त्यांचे पार्थिव मुंबईतील निवासस्थानी दाखल झाले आहे. उद्या त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. तेथून त्यांचे पार्थिव वर्सोवातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार नेण्यात आले व तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिनिधी

दिग्गजांनी वाहिली आदरांजली - कोलकात्यात त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. केके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली अनेक सेलिब्रिटी आले होते. वर्सोवा येथील पार्थ प्लाझा इमारतीत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. अभिजीत भट्टाचार्य, श्रेया घोषाल, जावेद अली, सलीम मर्चंट कबीर खान, शंतनू मोइत्रा, सुलेमान, अलका याज्ञीक आदी गीतकार त्यांचे मित्र, संगीत, चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी घरी येऊन अंतिमदर्शन घेतले. अनेकांना यावेळी शोक अनावर झाला होता.

के के यांची कारकिर्द -

कृष्णकुमार कुनाथ हे के के चे पूर्ण नाव. के केचा जन्म दिल्लीचा. पी सी मेनन आणि कुणानाथ कनकवल्ली ही त्याच्या पालकांची नावे. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या के के ने संगीतातले कुठेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नव्हते. दिल्लीच्या माऊंट मेरी स्कूल आणि किरोडीमल कॉलेज मध्ये शिक्षणादरम्यान त्याने अनेक सांगीतिक कार्यक्रमांत भाग घेतला. त्याचा निरागस आणि गोड आवाज ऐकल्यावर कौटुंबिक परिचयातून त्याला एक जिंगल गाण्यास मिळाले. त्याची पहिली जिंगल होती सँटोजन सूटिंग साठी आणि त्यानंतर के के ने ३५०० हून अधिक जिंगल्स गायल्या.

संगीतकार ए आर रहमान यांनी के के ची प्रतिभा ओळखली आणि त्याने आपले पहिले फिल्मी गाणे गायले. त्यानंतर विशाल भारद्वाज यांच्या संगीतदिग्दर्शनाखाली त्याने गुलझार दिग्दर्शित माचीस मध्ये छोड आए हम हे पहिले हिंदी गाणे गायले. परंतु सलमान खान आणि ऐश्वर्या राय अभिनित हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या गाण्याने त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. के के नेहमी पडद्यामागे राहण्यास पसंती देत असे. ‘माझी गाणी माझा चेहरा आहे’, असे त्याने एकदा आपल्या मुलाखतीत सांगितले होते. १९९९ च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा दर्शविणारे ‘जोश ऑफ इंडिया’ गाणे त्याने गायले होते ज्यात या गाण्यात भारतीय क्रिकेट संघाच्या सदस्यांनी देखील भाग घेतला होता.

मुलायम आणि गोड गळ्याचा मालक असलेल्या के के ने १९९९ मध्ये ‘पल’ हा त्याचा पहिला सांगीतिक अल्बम लाँच केलाहोता. त्यातील पल आणि यारों ही गाणी खूप लोकप्रिय झाली आणि ती आजही शाळांच्या शेवटच्या दिवशीच्या निरोपावेळी हमखास वाजविली जातात. यावरून कल्पना येईल की के के च्या आवाजातील जादू काय होती. हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप, तमिळ गाणे आपडी पोडू, देवदास मधील डोला रे डोला, वो लम्हे मधील क्या मुझे प्यार है ही त्याच्या लोकप्रिय गाण्यांमधील काही. तसेच ओम शांती ओम मधील आँखों में तेरी, बचना ए हसीनो मधील खुदा जाने, आशिकी २ मधील पिया आये ना, मर्डर ३ मधील मत आजमा रे, हॅप्पी न्यू इयर मधील इंडिया वाले आणि बजरंगी भाईजान मधील तू जो मिला ही गाणीदेखील के केची अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. के के ला सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले होते आणि साऊथ फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

के केने हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषांमधील चित्रपटांत पार्श्वगायन केले होते. त्याच्या पाठी त्याची पत्नी ज्योती आणि मुले नकुल कृष्ण कुनाथ आणि मुलगी तमारा कुनाथ हा परिवार पोरका झाला आहे. कृष्णकुमार कुनाथच्या आत्म्यास शांती लाभो ही ईटीव्ही भारत मराठी ची विनम्र श्रद्धांजली.

हेही वाचा :KK Passes Away : स्टेजवरील गर्मीमुळे घामाने भिजला होता केके - पाहा व्हिडिओ

Last Updated : Jun 2, 2022, 4:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details