महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता राज्य सरकारतर्फे निधी मंजूर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीची विनंती केली. या अनुषंगाने महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला असून पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण ३६५ कोटी ६७ लाख इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

By

Published : Oct 7, 2021, 2:53 PM IST

विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार

मुंबई -राज्यात जुलै २०२१मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली. यात शेतपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता बाधितांना ३६५ कोटी ६७ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी पुणे विभागासाठी १५० कोटी १२ लाख रुपये, कोकण विभागासाठी ८ कोटी ५१ लाख रुपये, अमरावती विभागासाठी ११८ कोटी ४१ लाख रुपये, नाशिक विभागासाठी १ लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी ७७ कोटी ९७ लाख रुपये, नागपूर विभागासाठी १० कोटी ६५ लाख रुपये याप्रमाणे एकूण ३६५ कोटी ६७ लाख इतका निधी मंजूर झाला आहे.

मदतनिधी

हेही वाचा -आभाळच कोसळले : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त, पाहा विशेष रिपोर्ट...

विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश

अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तत्काळ अतिवृष्टीमुळे उद्बवलेल्या पूरग्रस्त भागाचा दौरा करून पाहणी केली. तेथील शेतकऱ्याशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीची विनंती केली. या अनुषंगाने महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला असून पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण ३६५ कोटी ६७ लाख इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा -अतिवृष्टीतील एकही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही -ॲड. यशोमती ठाकूर

असे होणार अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचे वाटप

कोकण विभागासाठी ८ कोटी ५१ लाख रुपये, नाशिक विभागासाठी १ लाख रुपये, पुणे विभागासाठी १५० कोटी १२ लाख रुपये, अमरावती विभागासाठी ११८ कोटी ४१ लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी ७७ कोटी ९७ लाख, नागपूर विभागासाठी १० कोटी ६५ लाख रुपये याप्रमाणे एकूण ३६५ कोटी ६७ लाख इतका निधी मंजूर झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details