नवी मुंबई -मित्र वारंवार करत असलेल्या समलैगिंक संबंधाच्या मागणीला कंटाळून एका व्यक्तीने मित्राचा खून केल्याची घटना नवी मुंबई शहरात घडली आहे. या प्रकारामुळे नवी मुंबई शहरात खळबळ माजली आहे. सिमेंटचा ब्लॉक डोक्यात टाकून ही हत्या करण्यात आली आहे.
समलैगिंक संबंधांची मागणी करणाऱ्या मित्राचा मित्राने केला खून बंद गाडीत आढळला होता मृतदेह -
22 ऑक्टोबरला सिवूडस परिसरातील केंद्रीय विहार येथे बंद असलेल्या गाडीत एक व्यक्ती जखमी असल्याचे सिद्धार्थ पैठणे नावाच्या व्यक्तीने पहिले व ही बाब रात्रपाळी करणारा सुरक्षा रक्षक स्वप्नील काशीनाथ भारती या व्यक्तीला सांगितली या दोघांनी या घटनेची माहिती एनआरआय पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिली व पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी या जखमी व्यक्तीला नवी मुंबई महापालिका रुग्णालयात दाखल केले. मात्र संबंधित व्यक्तीला डोक्याला जबर मारहाण झाल्याने डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलिसांनी केले आरोपीला गजाआड -
मृताचे नाव रुपेश उर्फ रूपसिंग(27) असून, त्याच्या डोक्यात बसमध्ये सीमेंटचा ब्लॉक मारून त्याचा मित्र विजय मस्के यांनी खून केल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून मिळाली विजय मस्के हा फिरस्ता असल्याने पोलिसांना त्याची माहिती मिळणे कठीण होते, मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने करावे गावातून तांत्रिक तपास करीत आरोपीला अटक केले.
समलैगिंक संबंधांची मागणी -
मृत रुपेश व विजय हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र रुपेश हा विजयकडे समलैगिंक सबंधांची वारंवार मागणी करत असे त्याची ही मागणी विजयला आवडतं नसे. त्यामुळे तो टाळत असे 22 ऑक्टोबरला विजय आणि रुपेश दारू पिण्यासाठी एकमेकांना भेटले व एका बंद बसमध्ये ते दारू पिण्यास गेले दोघांनी दारू पिण्यास सुरवात केली तेव्हा रुपेशने पुन्हा विजयकडे समलैगिंक सबंधांची मागणी केली. दारूचा अंमल असणाऱ्या विजयने रस्त्यावरून सिमेंटचा एक ब्लॉक आणला व थेट रुपेशच्या डोक्यात टाकला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे पाहून विजयने तेथून पळ काढला.