महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 6, 2020, 11:40 PM IST

Updated : Jan 7, 2020, 12:41 AM IST

ETV Bharat / city

'फ्री काश्मिर' बाबत समोर आले स्पष्टीकरण; हा फलक काश्मीरमुक्तीसाठी नव्हे, तर...

'जेएनयू'मधील मारहाणी विरोधात 'गेटवे ऑफ इंडिया'वर गेल्या 24 तासांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान 'काश्मीर मुक्त' करण्याचे फलक झळकले आहेत. हे फलक काश्मिरी नव्हे तर मुंबईमधील विद्यार्थ्यांनी झळकावले आहेत. मात्र हे फलक काश्मीर मुक्तीसंदर्भात नसल्याची माहिती समोर आली आहे.

mumbai
जेएनयू मारहाणी विरोधातील आंदोलनाचे दृश्य

मुंबई- 'जेएनयू'मधील मारहाणी विरोधात 'गेटवे ऑफ इंडिया'वर गेल्या 24 तासांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान 'काश्मीर मुक्त' करण्याचे फलक झळकले आहेत. हे फलक काश्मिरी नव्हे तर मुंबईमधील विद्यार्थ्यांनी झळकावले आहेत. मात्र हे फलक काश्मीर मुक्तीसंदर्भात नसल्याची माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया देताना महेक

महेक आणि तिच्या मैत्रिणिंनी 'फ्री काश्मिर' म्हणजेच, काश्मिर मुक्तीचे फलक झळकवल्यामुळे सर्वच लोक आश्चर्यचकित होत होते. मात्र, महेकने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना याबाबत खुलासा केला आहे. काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करण्यासाठी नव्हे, तर तेथील नागरिकांनाही इतर भारतीयांप्रमाणेच स्वातंत्र्य मिळावे म्हणून हा फलक झळकवल्याचे तिने स्पष्ट केले.

यावेळी बोलताना, "काश्मीरमधून मानवता कुठे तरी हरवली आहे. आपण इथे राहून त्या ठिकाणच्या अडचणी समजू शकत नाही. जसे आपण स्वतंत्र आहोत त्या प्रमाणे काश्मीर मधील लोकांनाही स्वतंत्रता मिळाली पाहिजे. मी काश्मिरी नाही मुंबईमधून आहे. तरीही हे बोलत आहे. काश्मिरी जनतेच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. गेले150 दिवस त्याठिकाणचे सर्व व्यवहार बंद पडले आहेत. आपण असे राहू शकत नाही. आपल्या लढाईत काश्मिरी नागरिकांना सोबत ठेवून त्यांच्या स्वातंत्र्य मिळावी इतकीच माझी मागणी आहे", असे मत महेकने व्यक्त केले.

दरम्यन या फलकावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी या फलकासंदर्भातील 'एएनआय'च्या ट्विटचा आधार घेत, हे आंदोलन कशाचे आहे आणि काश्मीर मुक्तीच्या घोषणा का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच या फुटरीतावाद्यांना आपण का सहन करायचे, असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

हेही वाचा-गेट वे जवळ आंदोलकांनी गर्दी वाढली

Last Updated : Jan 7, 2020, 12:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details