मुंबई मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचा फोटो व्हॉटस् अॅपला डीपी Mumbai CP Vivek Fansalkar Whats App DP ठेवून गिफ्टची मागणी करणारे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने fake message on name of mumbai cp एकच खळबळ माजली. यानंतर मुंबई पोलिसांनी नागरिकांना या मेसेजला प्रतिसाद न देण्याचे आवाहन Request don't respond to cp messages केले आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते बाळसिंग राजपूत यांनी केली. Mumbai cp demand gift from whats app आरोपीने फणसळकर यांच्या संपर्क यादीतील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संदेश पाठवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. फणसळकर यांचे छायाचित्र भामट्यांनी व्हॉट्सअॅप प्रोफाईल म्हणून ठेवले. मात्र, कोणीही या फसवणूकीला बळी पडले नाही.
डीपीवरून गिफ्ट देण्याचे आवाहनमोबाईल क्र. ९३२९६०३२९४ याद्वारे अनोळखी मोबाईलधारकाने स्वतःच्या व्हॉटस् अॅप डीपीवर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचा खाकी गणवेषातील फोटो ठेवला आहे. त्याआधारे अनोळखी इसम हा पोलीस आयुक्तांच्या नावे अॅमेझॉन पे ई गिफ्ट विथ १०००० व्हॅल्यूची मागणी करीत होता. ते गिफ्ट लवकरात लवकर देण्याची विनंती करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या फोटोचा गैरवापरतरी मोबाईल क्र. ९३२९६०३२९४ चा अनोळखी मोबाईल धारक हा पोलीस आयुक्त यांचा खाकी वर्दीच्या गणवेषातील फोटोचा गैरवापर करून त्याव्दारे गिफ्ट अथवा इतर कोणत्याही प्रकारची मागणी करीत असल्याचा संदेश प्राप्त झाल्यास अथवा निदर्शनास आल्यास त्यास प्रतिसाद देवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुंबई पोलीस या संदर्भात कायदेशीर कारवाई करीत आहेत.