मुंबई -नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना पश्चिम रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूकीची घटना समोर आली आहे. चर्चगेटच्या एका हेड टीसीने ही घटना उघडकीस आणली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ क्रिडा अधिकाऱ्याला मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकार?
खेळात उत्तम प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूला रेल्वेमध्ये भरती केले जाते. खेळातील दर्जेदार सुविधा लक्षात घेत नवोदित खेळाडूंचे रेल्वेत नोकरीला लागून देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असते. मात्र खेळाडूंच्या या स्वप्नांचा गैरफायदा घेत बनावट नियुक्तीपत्र पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने खेळाडूंना दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. एक कबड्डीपटू आणि एक लाॅग टेनिस पटूला 'कमर्शियल कम तिकीट क्लार्क' या पदाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार हेड टिसीने उघडीस आणला आहे.
पोलिसांनी ठोकल्या बेड्या