ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमेरिका आणि कॅनडातील भारतीयांना लुबाडणाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद - इंटरनल रेवेन्यू सर्विस म्हणजे काय

ही टोळी बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका आणि कॅनडा स्थित नागरिकांना लक्ष्य करत होती. यानंतर ही टोळी या नागरिकांना बनावट कॉल सेंटरद्वारे स्वतःला 'इंटरनल रेवेन्यू सर्विस' किंवा 'इमिग्रेशन सर्विस'चा अधिकारी असल्याचे सांगत होती आणि त्यांची डॉलर स्वरूपात लाखो रुपयांची फसवणूक करत होती.

निशाण नागराज शिरसेकर
निशाण नागराज शिरसेकर
author img

By

Published : Sep 2, 2020, 5:14 PM IST

मुंबई - मुंबई पोलिसांच्या सी. आय. यू. विभागाने एका कारवाईत मुंबईतील मालाड पश्चिम येथे बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीकडून 40 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 10 लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे हस्तगत करण्यात आली आहेत. 29 ऑगस्टला ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी 'गांजा'ने भरलेल्या सिगरेट आणि चोरीची मोटरसायकल देखील हस्तगत केली आहे. या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवणाऱ्या टोळीचा म्होरक्या असून त्याने त्याच्या इतर साथीदारांसह देशातील विविध शहरांमधून मोबाईल फोनद्वारे बोगस कॉल सेंटर चालवल्याचे समोर आले आहे.

सदरची टोळी बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका आणि कॅनडा स्थित नागरिकांना लक्ष्य करत होती. यानंतर ही टोळी या नागरिकांना बनावट कॉल सेंटरद्वारे स्वतःला 'इंटरनल रेवेन्यू सर्विस' किंवा 'इमिग्रेशन सर्विस'चा अधिकारी असल्याचे सांगत होती आणि त्यांची डॉलर स्वरूपात लाखो रुपयांची फसवणूक करत होती. अमेरिका आणि कॅनडातील लोकांनी सरकारकडे असलेली थकबाकी न भरल्यास त्यांना तुरुंगवास होऊन दंड किंवा हद्दपारीची भीती घालून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम ही टोळी करत असल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा -अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निर्णय उद्या; राज्यपालांच्या भेटीनंतर उदय सामंतांची माहिती

प्रकरणी पोलिसांनी आरोपी निशाण नागराज शिरसेकर याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले. यावेळी 4 सप्टेंबरपर्यंत आरोपीची न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. आतापर्यंत आरोपीकडून पोलिसांनी 40 लाख रुपये आणि 200 ग्रॅम सोन्याची बिस्किटे ॲक्सिस बँकेच्या लॉकरमधून हस्तगत केली आहेत.

हेही वाचा -डोंगरीत इमारतीचा भाग कोसळला, एका महिलेचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details