मुंबईशिवसेनेचे युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे Aditya thackeray Fraud Photo यांचा फोटो वापरून फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर आदित्य ठाकरे यांचा फोटो ठेवून फसवणूक Fraud on name of Aditya Thackerays Whats App photo केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी Dadar Police Station गुन्हा दाखल केला आहे. अलीकडेच मुंबई पोलीस आयुक्तांचा फोटो डीपी ठेवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता आदित्य ठाकरे यांच्या नावानेसुद्धा फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. fraud Whats App DP of Aaditya Thackerya
अरोपीविरुद्ध गुन्हा दाखलआदित्य ठाकरे यांचा फोटो हा व्हॉट्स अॅपवर ठेवून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ४१७, ४१९, ५११, ६६ सी, ६६ डी अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दादर पोलीस करत आहेत.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या फोटोचाही गैरवापरअलीकडेच एका अज्ञात आरोपीने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या संपर्क यादीतील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संदेश पाठवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. फणसळकर यांचे छायाचित्र भामट्यांनी व्हॉट्सअॅप प्रोफाईल म्हणून ठेवले. मात्र, कोणीही या फसवणूकीला बळी पडले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी शुक्रवारी फसवणूक टोळीने तयार केलेला संदेश प्रसारित केला आणि सर्व पोलीस अधिकारी आणि नागरिकांना या फसवणूकीला बळी न पडण्याचे आवाहन केले असल्याचे उपायुक्त(अभियान) संजय लाटकर यांनी सांगितले होते. यापूर्वी सायबर ठगांकडून पोलीस महासंचालक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, आयकर विभागाचे मुंबई प्रमुख, महावितरणचे एमडी, वरिष्ठ आयएएस, आयपीएस आणि आयआरएस अधिकाऱ्यांना याच पद्धतीचा वापर करून फसणूक करण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचाSolapur Hospital IT raid सोलापुरातील छापेमारीबद्दल आयकर विभागाकडून अधिकृत माहिती नाही, डॉ. परळे यांचा खुलासा