महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Zero Covid Patient deaths - मुंबईत चौथ्यांदा शून्य मृत्यूंची नोंद, नवीन 283 कोरोना रुग्णांची नोंद - मुंबई कोरोना बरे होण्याचा दर

गेले पावणेदोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत विषाणूच्या दोन लाटा आल्या आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यात मुंबई महापालिकेला यश ( BMC success to control COVID 19 ) आले आहे. पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळे मुंबईमधील रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या घटली आहे. आज चौथ्यांदा रुग्णांच्या शून्य मृत्युची ( Corona patients zero deaths in Mumbai ) नोंद झाली.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Dec 18, 2021, 8:37 PM IST

Updated : Dec 18, 2021, 10:38 PM IST

मुंबई - ओमायक्रॉनच्या धास्तीत दिलासादायक बातमी आहे. गेल्या पावणे दोन वर्षात आज चौथ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज कोरोनाचे 283 नवे रुग्ण ( New corona patients in Mumbai ) आढळून आले आहेत.

गेले पावणेदोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत विषाणूच्या दोन लाटा आल्या आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यात मुंबई महापालिकेला यश ( BMC success to control COVID 19 ) आले आहे. पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळे मुंबईमधील रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या घटली आहे.

हेही वाचा-Amit Shah On DCC Bank Scam : 'हजारो कोंटींचे घोटाळे कसे झाले?, रिझर्व्ह बॅंकेने केले का ?' - अमित शाह

चौथ्यांदा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. कोरोनाच्या रुग्णसंख्येप्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात महापालिकेला यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद होत ( corona patients deaths in Mumbai ) होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 व 15 डिसेंबरला शून्य रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर आज चौथ्यांदा रुग्णांच्या शून्य मृत्युची ( Corona patients zero deaths in Mumbai ) नोंद झाली.

हेही वाचा-Kadam Vs Parab : गद्दार कोण मी.. की अनिल परब? रामदास कदम यांचा सवाल



आज 283 नवे रुग्ण -
18 डिसेंबरला 283 नवे रुग्ण आढळून ( new 283 corona cases in Mumbai ) आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 66 हजार 791 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 45 हजार 903 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1948 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी 2,321 दिवस इतका आहे. मुंबईमधील 19 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 1 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.03 टक्के इतका आहे.

हेही वाचा-JP Nadda on Uttarakhand Election : धामी सरकारच्या कामामुळे जनतेत उत्साह, उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार येईल - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

या दिवशी रुग्णसंख्या 200 च्या वर -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 4 डिसेंबरला पुन्हा वाढ होऊन 228, 5 डिसेंबरला 219, 8 डिसेंबरला 250, 9 डिसेंबरला 218, 11 डिसेंबरला 256, 14 डिसेंबरला 225, 15 डिसेंबरला 238, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबर 295, 18 डिसेंबरला 283 रुग्ण आढळून आले आहेत

Last Updated : Dec 18, 2021, 10:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details