मुंबई - राज्याच सध्या विधानपरिषद निवडणुकीची (Maharashtra MLC election) रणधुमाळी सुरू आहे. आज (26 नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे जोरदार राजकीय घडामोडी घडत होत्या. अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत अनेक राजकीय चर्चा सुरूच होत्या. शेवटी तडजोडींमधून राज्यातील सहा पैकी चार जागा बिनविरोध(Four Seats Unopposed) करण्याचा निर्णय झाला. दोन जागांचा तिढा न सुटल्याने या ठिकणी निवडणूक होणार आहे.
- या जागा झाल्या बिनविरोध -
बिनविरोध झालेल्या चार जागांमध्ये मुंबईतील दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे एक आणि नंदुरबारच्या एक जागेचा समावेश आहे. नागपूर आणि अकोला येथील जागेवर लढत होणार आहे. नागपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस, तर अकोला येथे शिवसेना विरुद्ध भाजप लढत होत आहे.