मुंबई -राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील ड्रग्ज माफिया देवेंद्र फडणविसांच्या इशाऱ्यावर चालतो, असा गंभीर आरोप केला होता. त्याला देवेंद्र फडणविसांनीही प्रत्युत्तर दिले. पाहुया नवाब मलिकांनी आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणविसांवर काय आरोप केले आणि मलिकांच्या आरोपांना फडणविसांनी काय उत्तर दिले.
- आरोप क्रमांक 1 : महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील ड्रग्ज माफिया देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर
आज नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील ड्रग्ज माफिया देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर चालतो, असा गंभीर आरोप केला होता. तसेच देवेंद्र फडणविसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एका व्यक्ती सोबतचा फोटो ट्विट करत तो ड्रग्ज माफिया असून फडणविसांचे आणि त्याचे घनिष्ठ संबंध असल्याचे म्हटले होते.
देवेंद्र फडणविसांचे उत्तर :
मलिकांच्या या आरोपला देवेंद्र फडणविसांनीही उत्तर दिले. 'जर एका फोटोवरून संपूर्ण भाजपावर ड्रग्ज आरोप लागत असतील तर नवाब मलिकांच्या जावायाच्या घरी ड्रग्ज सापडले आहे. त्यानुसार संपूर्ण एनसीपीचे ड्रग्जशी संबंध आहे, असे म्हणावे लागेल, असे फडणविसांनी म्हटले.
- आरोप क्रमांक 2 : ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी जयदीप राणा अमृता फडणवीसांच्या गाण्याचा फायनान्सर
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांची पत्नी अमृता यांनी नदी संवर्धनासाठीचे गाणे गायले होते. त्या गाण्यावर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता यांनी अभिनय केला होता. त्यासोबतच तत्कालिन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही अभिनय केला होता, त्याचा उल्लेख करुन मलिक म्हणाले, त्या गाण्याचा फायनान्सर हा जयदीप राणा होता. जयदीप राणासोबत अमृता यांचे फोटो आहेत. हे फोटो सार्वजिनक कार्यक्रमात लोक भेटतात असा फोटो नाही. तर ते एकमेकांना ओळखत असल्याच्या खूना करत काढलेला हा फोटा असल्याचा दावा मलिक यांनी केला होता.
देवेंद्र फडणविसांचे उत्तर :
मंत्री नवाब मलिक यांनी लावलेले आरोप हास्यास्पद आहे. रिव्हर मार्च या संघटनेने रिव्हर अँथम तयार केले होते. या टीममधील व्यक्तींनी आमच्यासोबत फोटो घेतले होते. चार वर्षांपूर्वीचे हे फोटो होते. त्यावरुन मलिक यांनी आम्हाला माफिया ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या पत्नीसोबतचा फोटो जाणीवपूर्वक ट्विट केला आहे.
- आरोप क्रमांक 3 : निरज गुंडे हाच देवेंद्र फडणविसांचा 'वाझे'