मुंबई -काळबादेवी वर्धमान जंक्शन येथील एका चार मजली इमारतीच्या नूतनिकरणाचे काम सुरू असताना काही भाग कोसळला. दुर्घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले आहे. सुदैवाने अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळत आहे.
कोणीही जखमी नाही :मिळालेल्या माहितीनुसार, वर्धमान जंक्शन, बँक ऑफ इंडिया जवळ, एल टी मार्ग, लोहार चाळ, काळबादेवी येथील एका चार मजली इमारतीच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरू होते. हे काम सुरू असतानाच आज सायंकाळच्या सुमारास काही भाग कोसळला. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल, अँबुलन्स आणि बेस्ट वीज विभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळत आहे.