मुंबई - शिवाजीनगर परिसरातील बैगनवाडीमध्ये ( Shivaji Nagar ) एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह ( Suicide of four person in the family Mumbai ) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार पती, पत्नी आणि दोन मुलांचे हे मृतदेह असून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे.
Shivaji Nagar Four Bodies Found : शिवाजीनगर परिसरात आढळले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह - बैगनवाडी भागात मृतदेह सापडले
बैगनवाडीमध्ये ( Shivaji Nagar ) एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह ( Suicide of four person in the family Mumbai ) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
![Shivaji Nagar Four Bodies Found : शिवाजीनगर परिसरात आढळले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह प्रातिनिधीक चित्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15957885-thumbnail-3x2-a.jpg)
प्रातिनिधीक चित्र
मृतकाचे नाव अस्पष्ट :प्राप्त माहितीनुसार, मृतदेहाची नावे अघ्यापही अस्पष्टच आहे. या मागे नेमके काय कारण असावे? याचा शोध पोलीस घेत आहेत. शिवाय शेजारी असलेल्या कुटुंबाकडून माहिती घेण्याचे काम पोलीस करत आहे.
हेही वाचा -Double decker bus overturning in Rishikesh: ऋषिकेशमध्ये डबल डेकर बस पलटी, थरारक व्हिडिओ व्हायरल