मुंबई -शिंदे सरकार सत्तरेवर आल्यापासून त्यांनी विविध रेल्वे प्रक्लपांसंदर्भात त्वरित मंजुरी देण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबईकरांसाठी मेट्रो आता थोड्या दिवसांत सुरू होणार असे चित्र आहे. लवकरच मेट्रोचे काम अधिक गतिमान होणार आहे. मुंबईतील रस्त्यावरील होणारी वाहतूक कोंडी, त्यातून होणार वेळेचा अपव्यय , लाखो मनुष्यबळ त्यामुळे वाया जाते. रस्त्यावरील वाहनांमुळे प्रचंड प्रदूषण वाढते, याला काही प्रमाणात रोखायचे तर मेट्रो हा देखील एक पर्याय आहे. त्यासाठीच
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्ग प्रकल्पाच्या पहिल्या ट्रेनचे पाहिले चार डबे मुंबईत आज पहाटे दाखल झाले आहेत.
मेट्रोमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत - मुंबईतील प्रचंड लोकसंख्या, विविध सरकारी कार्यालय, कॉर्पोरेट कार्यालय शिवाय अनेक उद्योग धंदे त्यांचे देखील कार्यालय
मुंबईत आहेत. देशातील लाखो लोक रोजगारासाठी मुंबईत येतात. त्यामुळे लाखो मोटारी, दुचाकी, अवजड वाहनेही मुंबईच्या रस्त्यावर धूर ओकत प्रदूषण होते. त्यावर उपाय म्हणून सागरी वाहतूक, त्यासोबत मेट्रो रेल्वेची वाहतूक हा पर्याय शासनाने स्वीकारला. त्यानुसार धोरणात्मक निर्णय घेतला. नवीन सरकारने विविध मंजुरी देखील दली. त्यामुळे मेट्रोचे काम प्रगतीपथावर दिसत आहे. अशी माहिती मुंबई मेट्रो रेल्वेच्या प्रवक्त्यांनी ईटीव्हीला दिली.