महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 5, 2022, 7:47 AM IST

Updated : Oct 5, 2022, 10:04 AM IST

ETV Bharat / city

वांद्रे वरळी सी लिंक येथे झालेल्या भीषण अपघातात ५ ठार

वांद्रे वरळी सी लिंकवर ( accident on Mumbai Bandra Worli Sea Link ) चार कार आणि अॅम्ब्युलन्स यांच्यात झालेल्या धडकेत 10 जण जखमी झाले ( 10 inured in accident ) आहेत. पहा सीसीटिव्ही फुटेज.....

Fatal accident on Bandra Worli Sea Link
वांद्रे वरळी सी लिंकवर भीषण अपघात

मुंबई - दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतून दुःखद बातमी आहे. वांद्रे वरळी सी लिंकवर ( accident on Mumbai Bandra Worli Sea Link ) चार कार आणि अॅम्ब्युलन्स यांच्यात झालेल्या धडकेत 10 जण जखमी झाले ( 10 inured in accident ) आहेत. या रस्ता अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. वांद्रे-वरळी सीलिंकवर भीषण अपघात झाला. पहाटे 3.30 च्या सुमारास चार कार एकमेकांवर आदळल्याचं सांगण्यात येत आहे. 6 जण गंभीर जखमी झाले आहेत

वांद्रे वरळी सी लिंकवर भीषण अपघात

जखमींवर नायर आणि लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमींची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

वांद्रे-वरळी रस्ता बंदमिळालेल्या माहितीनुसार याआधीही वाहनाचा अपघात झाला होता, जखमींना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आली होती. जखमींना रुग्णवाहिकेतून नेण्याआधीच अपघातग्रस्त कार आणि रुग्णवाहिकेला आणखी तीन कारची धडक बसली. या भीषण अपघातानंतर सीलिंकवर खळबळ उडाली आहे. पोलीस अपघाताचा अधिक तपास करत असून खबरदारी म्हणून वांद्रे-वरळी रस्ता बंद करण्यात आला आहे. मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर पहाटे झालेल्या भीषण अपघातात १२ हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पाचही गाड्यांचा चक्काचूरमुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर पहाटे साडेतीन वाजता भीषण अपघात झाला. खरं तर, येथे आधीच क्रॅश झालेल्या कार आणि तेथे उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकेला आणखी ३ वाहने धडकली. यानंतर अनेक जण जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की पाचही गाड्यांचा चक्काचूर झाला.

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत ते लवकर बरे होवो. जीवितहानी झालेल्या कुटुंबियाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.

Last Updated : Oct 5, 2022, 10:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details