महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बच्चन कुटुंबीयांमध्ये चार कोरोनाबाधित; पालिकेकडून सर्व बंगले सील - बच्चन कुटुंबीय बंगले सील

बच्चन कुटुंबीय राहत असलेल्या प्रतीक्षा, जनक, जलसा, वत्सा या चारही बंगल्यात पालिकेने सॅनिटायझेशन केले आहे. या बंगल्यात कोरोना रुग्ण आढळून आल्याने हे चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.

Four bungalows of Bacchan family sealed by BMC
बच्चन कुटुंबीयांमध्ये चार कोरोनाबाधित; पालिकेकडून सर्व बंगले सील..

By

Published : Jul 12, 2020, 4:55 PM IST

मुंबई - अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना काल शनिवारी कोरोना झाल्याचे समोर आले होते. याबाबत आज मुंबई महापालिकेला माहिती मिळताच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची टेस्ट केली असता जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बच्चन कुटुंबीयांतील चार जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ते राहत असलेले चार बंगले सील करण्यात आले आहेत.

महानायक अमिताभ बच्चन यांनी खोकला आणि कफ असल्याने आपली कोरोना चाचणी केली होती. या दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांचीही टेस्ट खासगी लॅब मधून करण्यात आली होती. त्यात अमिताभ व अभिषेक बच्चन हे दोघे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. मात्र त्यांच्या कुटुंबातील जया बच्चन, ऐश्वर्या, आराध्या यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. अमिताभ आणि अभिषेक यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

चार बंगले सील -

दरम्यान, बच्चन कुटुंबीय राहत असलेल्या प्रतीक्षा, जनक, जलसा, वत्सा या चारही बंगल्यात पालिकेने सॅनिटायझेशन केले आहे. या बंगल्यात कोरोना रुग्ण आढळून आल्याने हे चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली. तसेच, बच्चन यांच्या बंगल्यात काम करणाऱ्या 54 कर्मचाऱ्यांची स्क्रीनिंग करून चाचणी करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत.

हेही वाचा :तापसी पन्नूचा 'लूप लपेता' ठरणार कोरोना विमा संरक्षण लाभलेला पहिला चित्रपट

ABOUT THE AUTHOR

...view details