महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 27, 2020, 9:50 PM IST

ETV Bharat / city

मुंबईत आज 2587 रुग्णांची कोरोनावर मात, आढळले 1460 नवे रुग्ण, 105 जणांचा मृत्यू

मुंबईत आज नवे 1460 रुग्ण आढळून आले असून 105 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 73747 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 4282 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज एकाच दिवशी 2587 रुग्ण बरे झाले आहेत.

mumbai
संग्रहित छायाचित्र

मुंबई- जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नवे 1460 रुग्ण आढळून आले असून 105 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 73747 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 4282 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज एकाच दिवशी 2587 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापार्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 42331 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 27134 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत आज 105 जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी 41 मृत्यू गेल्या 48 तासांमधील आहेत. तर 64 मृत्यू 48 तासांपूर्वीचे आहेत. 105 मृत्यूपैकी 88 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 72 पुरुष आणि 33 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 7 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 69 जणांचे वय 60 वर्षावर तर 41 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.

मुंबईमधून आज 2587 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 42,331 वर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 73747 वर पोहोचला आहे. त्यापैकी 4282 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमधून आतापर्यंत 42331 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 27134 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 55 टक्क्यांवर पोहोचला आहे. 19 ते 25 जूनपर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.67 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दरवाढीचा दर 40 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा 756 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभागात कंटेनमेंट झोन म्हणून सिल करण्यात आले आहेत. तर कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 6005 इमारतीमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सिल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details