मुंबई -राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एकूण 351 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. कर्तव्य बजावत असताना आतापर्यंत राज्यात 142 पोलिसांचा मृत्यू झाला असून यामध्ये 15 पोलीस अधिकारी तसेच 127 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत 1,4067 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून, यामध्ये 1,499 अधिकारी तर 12,568 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 2569 पोलीस कर्मचारी हे कोरोनाग्रस्त म्हणून उपचार घेत असून यात 342 पोलीस अधिकारी तर 2,227 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 11,356 पोलीस हे कोरोनातुन पूर्णपणे बरे झाले असून यामध्ये 1142 पोलीस अधिकारी तर 10214 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
धक्कादायक; राज्यात गेल्या 24 तासात 3 पोलिसांचा कोरोनाने मृत्यू तर 351 पोलीस कोरोनाबाधित
पोलिसांनी 95997 वाहने जप्त केली असून तब्बल 22 कोटी 96 लाख 99हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये 89 पोलीस जखमी झाले आहेत.
राज्यभरात अडीच लाखांवर गुन्हे, तर 336 ठिकाणी पोलिसांवर हल्ले -
आतापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 241923 गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 829 जणांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. राज्यभरात 336 प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला असून याप्रकरणी 891 आरोपींना पोलिसांना अटक केली आहे. राज्यात, अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली असून आतापर्यंत 33 हजार 817 आरोपींना अनधिकृत वाहतूक प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 95997 वाहने जप्त केली असून तब्बल 22 कोटी 96 लाख 99हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये 89 पोलीस जखमी झाले आहेत. वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 69 घटना घडलेल्या आहेत.