मुंबई -राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, एकूण 346 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कर्तव्य बजावताना आतापर्यंत राज्यात 148 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये 15 अधिकारी तसेच 133 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत 14641 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये 1555 अधिकारी तर 13086 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 2741 पोलीस कर्मचारी हे कोरोना ग्रस्त म्हणून उपचार घेत असून यात 353 पोलीस अधिकारी तर 2388 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 11752 पोलीस हे कोरोनातूूून पूर्णपणे बरे झाले असून यामध्ये 1187 पोलीस अधिकारी तर 10565 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
आतापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 243595 गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाईन चा नियम मोडणाऱ्या 829 जणांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. राज्यभरात 338 प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला असून याप्रकरणी 891 आरोपींना पोलिसांना अटक केली आहे.
राज्यात मागील 24 तासात 346 पोलिसांना कोरोनाची लागण; 2 जणांचा मृत्यू
लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत 14641 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये 1555 अधिकारी तर 13086 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 2741 पोलीस कर्मचारी हे कोरोना ग्रस्त म्हणून उपचार घेत असून यात 353 पोलीस अधिकारी तर 2388 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
संग्रहित छायाचित्र
राज्यात अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. यात आतापर्यंत 34017 आरोपींना अनधिकृत वाहतूक प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 96032 वाहने जप्त केली आहेत. तब्बल 23 कोटी 29 लाख 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये 89 पोलीस जखमी झाले आहेत. वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 71 घटना घडलेल्या आहेत.