महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gangster Chhota Shakeel Brother in law गँगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटच्या मोबाईलमध्ये 300 नंबर संशयस्पद, एनआयएची न्यायालयात माहिती

छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटच्या फोनमध्ये संशयीत 300 मोबाईल क्रमांक मिळून आल्याची धक्कादायक माहिती एनआयएने आज न्यायालयात दिली. सलीम फ्रूट हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्रहिमसाठी सोन्याची तस्करी करत असल्याचेही एनआयएने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सगळ्यांचा तपास करण्यासाठी एनआयएने सलीम फ्रूटच्या 10 दिवसाच्या कोठडीची मागणी केली होती. अखेर न्यायालयाने त्याला 24 ऑगस्टपर्यंत कोठडी ठोठावली आहे.

Gangster Chhota Shakeel Brother in law
सलीम फ्रुट

By

Published : Aug 17, 2022, 8:26 PM IST

मुंबई -अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार गँगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा मोहम्मद सलीम मोहम्मद इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रुटला Gangster Chhota Shakeel Brother in law Salim Fruits आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी सलीम फ्रुटच्या मोबाईलमधील 300 लोकांचे संशयीत नंबर Found 300 Suspected Number in Salim Fruits Phone आढळले आहेत. ते अद्यापही सीडीआरमार्फत तपासायचे आहेत. सलीम फ्रुटने Gangster Chhota Shakeel Brother in law Salim Fruits मुंबईमध्ये आणि भारतामध्ये अनेक ठिकाणी खंडणीच्या मार्फत आलेले पैसे दाऊद इब्राहिमला Underworld Don Dawood Ibrahim दिल्याची माहिती समोर आलल्याचे एनआयएने आज न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे न्यायालयाने सलीम फ्रुटला 24 ऑगस्टपर्यंत एनआयए कस्टडी दिली आहे.

सलीम फ्रुट डी कंपनीसाठी करायचा सोन्याची स्मगलिंगसलीम फ्रुटचे आतापर्यंत आठ वेळा साक्ष रेकॉर्ड केली गेली आहे. त्यामध्ये 1 हजारापेक्षा जास्त डॉक्युमेंट जप्त करण्यात आले असून त्यामध्ये डायरीसह काही इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडलेले आहेत. आतापर्यंत 19 लोकांच्या साक्ष नोंदवण्यात आलेल्या आहेत. तपासादरम्यान सलीम फ्रुट Gangster Chhota Shakeel Brother in law Salim Fruits तपासात सहकार्य करत नसल्याचे देखील एनआयएने म्हटले आहे. सलीम फ्रुट डी कंपनीसाठी Underworld Don Dawood Ibrahim सोन्याची स्मगलिंग देखील करत असल्याचे तपास यंत्रणेने आज कोर्टासमोर सांगितले आहे. या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणखी 10 दिवसाची एनआयए कोठडी देण्यात यावी, अशी मागणी एनआयएतर्फे करण्यात आली आहे. मात्र न्यायालयाने सलीम फ्रुटला 24 ऑगस्टपर्यंत एनआयए कस्टडी दिली आहे.

हसीना पारकरनंतर सलीम फ्रुट पाहायचा डी कंपनीचे कामअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची बहीण हसीना पारकरच्या मृत्यूनंतर डी कंपनीचे Underworld Don Dawood Ibrahim भारतातील काम सलीम फ्रुट पाहात असल्याचे एनआयएने कोर्टात म्हटले आहे. छोटा शकीलचा मेव्हणा असल्याने सलीम फ्रुट Gangster Chhota Shakeel Brother in law Salim Fruits छोट्या शकीलच्या नावाने अनेक बिझनेसमॅन आणि बिल्डरांना डी कंपनीच्या नावाने धमकी देत होता. त्या माध्यमातून खंडणी मागण्याचे काम करत आहे, असा देखील आरोप एनआयए तर्फे करण्यात आला आहे.

एनआयए करणार सलीमच्या खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट3 फेब्रुवारी 2022 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने दाऊद इब्राहिमचा Underworld Don Dawood Ibrahim तपास एआयएकडे दिल्यानंतर एआयएने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात छापेमारी केली होती. त्यावेळी देखील सलीम फ्रुटवाल्याची Gangster Chhota Shakeel Brother in law Salim Fruits चौकशी करण्यात आली होती. सलीमच्या विरोधात एनआयएकडे पाच बिल्डरांनी आपली बाजू मांडली आहे. एनआयए सलीमच्या खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करणार आहे. सलीमच्या घरात इतर अनेक लोकांच्या मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. याबरोबरच सलीमच्या घरी लाखो रुपयांच्या विदेशी तस्करीच्या सिगारेट देखील सापडल्या आहेत. सलीमशी संबंधित सुमारे 10000 पानांची कागदपत्रे आहेत. यामध्ये तेरा बाइट डेटाचा समावेश आहे. याबद्दल सलीमची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याची कोठडी मिळावी अशी मागणी एनआयएने केली होती.

सलीम फ्रूट डी कंपनीच्या दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे, तस्करी, नार्को टेररिझम, मनी लाँड्रिंग, मालमत्ताचे बेकायदेशीर व्यवहार करणे आदी आरोप तपास यंत्रणेने केले आहेत. छोटा शकील Gangster Chhota Shakeel आणि डी कंपनीच्या नावावर मोठ्या प्रमाणात खंडणी उकळण्यात सक्रिय भूमिका बजावल्याचा सलीम फ्रूटवर आरोप आहे.

सलीम फ्रूटच्या घरात छापेमारीयावर्षी मे महिन्यात एनआयएकडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या Underworld Don Dawood Ibrahim साथीदारांविरुद्ध मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. तेव्हा सलीम फ्रूट याच्या घरात छापेमारी करण्यात आली होती. यावेळीही सलीम फ्रूटची Gangster Chhota Shakeel Brother in law Salim Fruits चौकशी करण्यात आली होती. मे महिन्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या Underworld Don Dawood Ibrahim साथीदारांवर मुंबई आणि ठाण्यात 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले तेव्हा देखील त्याला ताब्यात घेण्यात आले होते. या झडतीमध्ये केंद्रीय एजन्सीने अनेक कागदपत्रे जप्त केली होती.

दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी दाऊदचे विशेष युनिटएनआयएने दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि यांच्या जवळच्या साथीदारांविरुद्धही एफआयआर दाखल केली होती. एफआयआरनुसार पाकिस्तानातून दाऊद इब्राहिमने Underworld Don Dawood Ibrahim भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी एक विशेष युनिट तयार केले होते. या युनिटचे काम भारतातील राजकीय नेत्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करणे हे होते. दाऊद इब्राहिम Dawood Ibrahim आणि छोटा शकील Gangster Chhota Shakeel यांनी पाकिस्तानातून भारतात दंगली भडकवण्याचा कट रचला होता, असेही एफआयआरमध्ये म्हटले आहे.

कोण आहे सलीम फ्रुट?कौटुंबिक नात्यामुळे सलीम फ्रूट छोटा शकीलच्या अगदी जवळ आहे. छोटा शकील त्याला आपल्या मुलाप्रमाणे वागवतो. छोटा शकीलच्या पत्नीच्या धाकट्या बहिणीशी सलीमचा विवाह झाला आहे. सलीमचे वडील उमर कुरेशी हे मुंबईतील नल बाजार परिसरात फळे विकायचे. त्यामुळे सलीमला सलीम फ्रूट म्हणून संबोधले जाते. या टोळीत सामील होण्यापूर्वी सलीम दुबईला फळे निर्यात करायचा. दुबईमध्ये त्याचा एक आलिशान बंगला देखील आहे. सलीमविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एनआयएने मुंबईतील माहीम भागातील सुहेल खंडवानी यांच्या घरावर छापा टाकला होता. खांडवानी हे मुंबईतील माहीम दर्गा आणि हाजिअली दर्ग्याचे विश्वस्त आहेत.

हेही वाचा Sanjay Raut : संजय राऊतांना जामिन दिल्यास साक्षीदारांना धमकवण्याची शक्याता; ई़डीचा न्यायालयात युक्तिवाद

ABOUT THE AUTHOR

...view details