मुंबई- कोरोना विषाणूचे मुंबईत आज नवे 1372 रुग्ण आढळून आले असून 73 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 81634 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 4759 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज एकाच दिवशी 1698 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 52392 वर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 24483 सक्रिय रुग्ण असून मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 64 टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नव्याने 1372 रुग्ण आढळून आले आहेत. तर 73 जणांचा मृत्यू झाला आहे. 73 मृत्यूपैकी 58 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 49 पुरुष आणि 24 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 4 जणांचे वय 40 वर्षाखाली होते. 40 जणांचे वय 60 वर्षावर तर 29 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 1698 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 52392 वर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 81634 वर पोहोचला आहे. त्यापैकी 4759 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमधून आतापर्यंत 52392 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 24483 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.