मुंबई - गृह विभागाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर कारवाई करत परमविर सिंग यांना दिले जाणारे वेतन रोखले असल्याची माहिती समोर येत आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग नेमके कुठे आहेत? -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गेल्या काही महिन्यापासून बेपत्ता आहे. परमबीर सिंग यांच्यावर खंडणी तसेच बेकायदेशीर कृत्य ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे मुंबई आणि ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. यासंबंधी चौकशीसाठी पोलीस विभागाकडून वेळोवेळी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र अद्यापही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग नेमके कुठे आहेत? याबाबत राज्य सरकारला कोणतीच माहिती नाही. मुंबईचे पोलीस आयुक्त असताना राज्याचे तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये अवैधरित्या जमा करण्याचा आरोप पत्राद्वारे परमबीर सिंग यांनी लावला होता. या आरोपानंतर परमबीर सिंग बेपत्ता असल्याची चर्चा आहे.