मुंबई -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh) यांना फरार गुन्हेगार म्हणून घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने (Mumbai's Esplanade court) परवानगी दिली आहे. आता, पोलीस त्यांना वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित करू शकतात आणि त्याला फरारी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात. जर ते ३० दिवसांच्या आत समोर आले नाहीत, तर मुंबई पोलीस (Mumbai Police) त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करतील, असे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी सांगितले.
...नाही तर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया -
मुंबई गुन्हे शाखेतर्फे (Mumbai Crime Branch) सिंग यांना फरार आरोपी घोषित करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यावर मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने आज निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस हे आता फरार गुन्हेगार म्हणून घोषित करू शकतात. त्यानंतर ते जर पोलिसांसमोर हजर झाले नाही तर पोलिस त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करतील, अशी माहिती विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.