महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Har Ghar Tiranga : निकृष्ट दर्जाचे राष्ट्रध्वज आम्ही घरावर लावणार नाही - माजी महापौर किशोरी पेडणेकर - निकृष्ट आणि सदोष राष्ट्रध्वज पुरवठा

निकृष्ठ दर्जाचे राष्ट्रध्वज लावल्याने ध्वजसंहितेचा अवमान होणार आहे. आम्हाला राष्ट्रध्वजाचा आदर आणि अभिमान आहे. यामुळे असे निकृष्ट आणि सदोष राष्ट्रध्वज आम्ही घरावर लावू शकत नाही, असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Former Mayor Kishori Pednekar ) यांनी म्हटले आहे.

Kishori Pednekar
Kishori Pednekar

By

Published : Aug 10, 2022, 7:15 PM IST

Updated : Aug 10, 2022, 7:27 PM IST

मुंबई -स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवा निमित्त मुंबई महापालिका प्रशासनाकडून राष्ट्रध्वज वाटप केले जात आहेत. मात्र हे राष्ट्रध्वज निकृष्ट असून ते सदोष आहेत. असे राष्ट्रध्वज लावल्याने ध्वजसंहितेचा अवमान होणार आहे. आम्हाला राष्ट्रध्वजाचा आदर आणि अभिमान आहे. यामुळे असे निकृष्ट आणि सदोष राष्ट्रध्वज आम्ही घरावर लावू शकत नाही, असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Former Mayor Kishori Pednekar ) यांनी म्हटले आहे. दरम्यान निकृष्ट आणि सदोष राष्ट्रध्वज पुरवठा करणाऱ्या पुरवठादारावर कारवाईची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

प्रतिक्रिया देताना माजी महापौर किशोरी पेडणेकर

निकृष्ट ध्वजाबाबत पालिका आयुक्तांची भेट :'हर घर तिरंगा' अभियान मुंबईमध्ये राबवले जात असून त्यासाठी ३५ लाख घर, दुकाने, सरकारी खासगी कार्यालये आदी ठिकाणी ५० लाख राष्ट्रध्वज लावले जाणार आहेत. त्यासाठी मुंबई महापालिकेकडून घरोघरी ध्वजांचे वाटप केले जात आहे. वाटप करण्यात येणारे राष्ट्रध्वज हे ध्वज संहितेचे उल्लन्घन करणारे आहेत. याच्या तक्रारी आल्यावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, ऍडव्होकेट भावीन सावला यांच्या उपस्थितीत पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.



'ध्वज घरावर लावू शकत नाही' : राष्ट्रध्वज वाटप करण्याची मोहीम चांगली आहे. या मोहिमेला आमचा विरोध नाही, मात्र त्यादरम्यान जे निकृष्ट दर्जाचे ध्वज वाटप केले जात आहेत, त्यामुळे राष्ट्रध्वज संहितेचा अवमान होत आहे. बहुसंख्य ध्वजांचा आकार हा आयातुकृती नाही, भगवा सफेद आणि हिरवा रंग यांच्या आकरा छोटे मोठे आहेत, अशोक चक्र चुकीच्या पद्धतीने प्रिंट करण्यात आले आहे, ध्वज कशाही प्रकारे कापले आहेत. असे ध्वज आपल्या घरावर लावल्यास ध्वज संहितेचा अवमान होऊ शकतो. आम्ही ध्वजाचा आदर करतो यामुळे असे ध्वज आम्ही आमच्या घरावर लावू शकत नाही असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.


'पुरवठादारावर कारवाई करा' : मुंबई महानगरपालिकेने सरकारच्या आदेशाने ध्वज घरोघरी वाटप केले आहेत. निकृष्ट आणि सदोष ध्वज पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराकडून पाठवले आहेत. अशा पुरवठादारावर कारवाई करण्याची मागणी आम्ही पालिका आयुक्तांकडे केली आहे. यावर आयुक्तांनी आम्ही तुमचे म्हणणे संबधितांपर्यंत पोहचवू असे सांगितले असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.

हेही वाचा -Azadi Ka Amrit Mahotsav : बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणारी शिक्षिका; आत्तापर्यंत पटकावले ६२ पुरस्कार

Last Updated : Aug 10, 2022, 7:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details