मुंबई- मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मनोज पाटील याने सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्याने अभिनेता साहिल खानचा उल्लेख केला आहे. मनोज पाटील सध्या कूपर रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज पाटीलने गोळ्या(औषध) घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलने केला आत्महत्येचा प्रयत्न, अभिनेता साहिल खानवर आरोप - बॉडिबिल्डर मनोज पाटील
मनोज पाटीलने अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावरही व्हिडिओ शेअर करत हे आरोप केले होते. त्रास आणि बदनामीमुळेच आपण आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचे मनोज पाटीलने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
![मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलने केला आत्महत्येचा प्रयत्न, अभिनेता साहिल खानवर आरोप बॉडी बिल्डर मनोज पाटीलने केला आत्महत्येचा प्रयत्न](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13079004-221-13079004-1631771615094.jpg)
बॉडी बिल्डर मनोज पाटीलने केला आत्महत्येचा प्रयत्न
Last Updated : Sep 16, 2021, 12:18 PM IST