महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवाजीराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी नाही.. - शिवाजीराव पाटील यांना शिवसेना पक्षातून काढले

शिवसेनेचे उपनेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Adhalrao Patil News ) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात ( Shivajirao Patil removed from shivsena ) आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पाटील ( Shivajirao Patil tweet ) यांना पक्षातून काढल्याचा दावा करण्यात आला आहोता. मात्र त्यांची पक्षातून हकालपट्टी झालेली नाही.

Shivajirao Patil removed from shivsena
शिवाजीराव पाटील

By

Published : Jul 3, 2022, 9:27 AM IST

Updated : Jul 3, 2022, 11:36 AM IST

मुंबई -शिवसेनेचे उपनेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Adhalrao Patil News ) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली नाही. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पाटील ( Shivajirao Patil removed from shivsena ) यांना पक्षातून काढल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाशी बडखोरी केली. त्यांनी शिवसेना आणि अपक्ष आमदारांचा मिळून एक गट स्थापन केला आणि नुकतेच भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झालेत. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव पाटील ( Shivajirao Patil tweet ) यांनी ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

हेही वाचा -Legislative Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघा़डीचा आक्षेप : नाना पटोले

शिवसैनिक यामुळे चांगलाच आक्रमक - राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. शिवसैनिक यामुळे चांगलाच आक्रमक झाला आहे. काही ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले जात आहे. दुसरीकडे शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शिवसेनेतील नेत्यांकडून मुख्यमंत्री शिंदे यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. शिवसेना उपनेते आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवाजीराव पाटील यांनी सोशल मीडियावर 'गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा! अभिनंदन मुख्यमंत्री साहेब' अशा आशयाचा उल्लेख केला आहे. त्या पोस्टमध्ये आढळराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा कुठेही फोटो वापरलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने निलंबित केले आहे. अशातच शिवसेनेच्या नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची हाकलपट्टी केल्याचा दावा करण्यात आला होता.

कोण आहेत शिवाजीराव पाटील? -शिवसेनेचे फायरब्रँड नेते म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील ओळखले जातात. पुणे शहरात शिवसेनेला त्यांनी मोठे बळ दिले. 2004 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून गेले. 2009 आणि 2014 या सलग तीन लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांच्या संसदेतील कामगिरीनिमित्त त्यांना संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी शिवाजीराव आढळराव पाटील भविष्यात संसदेत असतील, असा विश्वास व्यक्त केला होता.

पदाधिकाऱ्यांकडून लिहून घेतले एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र -शिवसेनेचे 39 आमदार आपल्या सोबत नेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जबर धक्का दिला. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार आपल्या बाजूने वळवून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत खाली खेचण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले. पक्षात झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणणारी आहे. मात्र, यापुढे पक्षात बंड होऊ नये यासाठी शिवसेना पक्षाकडून आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याकडून पक्षासोबत एकनिष्ठ राहण्याचे प्रमाणपत्र लिहून घेतले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत देखील पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र लिहून घेतले गेल्याची माहिती मिळत ( Shiv Sena Workers Loyalty Certificate ) आहे. या आधीही शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून शिवबंधन बांधले जात होते.

विरोधकांची प्रमाणपत्रावर टीका - पक्षाचा कार्यकर्ता हा विश्वासावर चालत असतो. शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या प्रेमाने शिवसेनेच्या जवळ आहेत. शिवसैनिकांकडे असलेले शिवबंधन हे खरे आहे. 20 रुपयांचा वडापाव खाणाऱ्या कार्यकर्त्याला 100 रुपयांचे प्रमाणपत्र बनवायला लावणे योग्य नसल्याची खरमरती टीका बंडखोर आमदार गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेवर केली आहे.

हेही वाचा -Eknath Shinde On Balasaheb Thackeray : खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे स्वप्न साकार, अडीच वर्षांच्या कामाचा अनुशेष भरून काढू - एकनाथ शिंदे

Last Updated : Jul 3, 2022, 11:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details