मुंबई- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि कोकणातील नेते माणिकराव जगताप यांचे निधन झाले आहे. कोरोना झाल्यामुळे मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, कोरोनाच्या या लढ्यात माणिकराव जगताप यांची प्राणज्योज आज(सोमवारी)सकाळी मालवली आहे. वयाच्या 54 व्या वर्षी माणिकराव जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर काँग्रेसच्या नेत्यांसह राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माझे निकटचे सहकारी माणिकराव जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात काँग्रेस पक्षाचे कोकणातील एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे. जगताप हे उत्तम संघटक होते, लोकप्रश्नांवर हिरिरीने काम करणारे नेते होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसची मोठी हानी झाली असून, मी एक बंधुतुल्य मित्र गमावला असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन - महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप
काँग्रसेचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचेन निधन झाले आहे. त्यांचे निधन अतिशय दुःखदायक आहे. हसतमुख, जीवंत व्यक्तीमत्व व काँग्रेस चे खंदे नेतृत्व हरपले. अशी भावना व्यक्त करत काँग्रेसच्या नेत्यांनी माणिकराव यांना श्रद्धांजली वाहिली
माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन
विद्यार्थी काँग्रेसमधून माणिकराव जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषवली. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते महाड विधान सभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते. सध्या रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती.