मुंबई -बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागावा, अशी अपेक्षा माजी आदिवासी मंत्री केसी पाडवी यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घटनापिठाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात अजूनही लोकशाही आणि न्यायव्यवस्था आहे, असे आम्ही मानतो, असेही माजी मंत्री केसी पाडवी ( Former minister KC Padvi ) यांनी म्हटले आहे.
KC Padvi : 'न्याय व्यवस्थेने लवकरात लवकर न्याय द्यावा' - न्यायालयाने लवकर न्याय द्यावा
राज्यातील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घटनापिठाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात अजूनही लोकशाही आणि न्यायव्यवस्था आहे, असे आम्ही मानतो, असेही माजी मंत्री केसी पाडवी ( Former minister KC Padvi ) यांनी म्हटले आहे.
![KC Padvi : 'न्याय व्यवस्थेने लवकरात लवकर न्याय द्यावा' KC Padvi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15832640-thumbnail-3x2-a.jpg)
KC Padvi
प्रतिक्रिया देताना माजी मंत्री केसी पाडवी
अपेक्षित निकाल :सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा तसा अपेक्षितच होता. न्यायालयाने आता अधिक वेळ न लावता राज्यात सरकार अधांतरी अस्थिर आहे, अशी भावना जनमानसात होऊ नये यासाठी त्वरित निकाल दिला तर ते योग्य राहील. मग निकाल काहीही, असो असेही केसी पाडवी यांनी म्हटले आहे.