मुंबई : महापालिका आयुक्त व प्रशासक विरोधकांच्या दबावाला बळी पडून मुंबई महानगरपालिकेत स्थायी समिती ( Standing Committee in BMC ) आणि पालिका सभागृहाने घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करून ते निर्णय रद्द करीत आहेत. हा महापालिका सभागृहाचा अवमान असल्याने मुंबईचे माजी महापौर ( Former mayor ) किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar ) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तशी नाराजी माजी महापौरांनी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र पाठवून ( Letter of displeasure from former mayor ) व्यक्त केली आहे.
काय म्हटले आहे पत्रात : महानगरपालिकेच्या कार्यकाळात महानगरपालिका तसेच स्थायी समितीसह विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये फेरफार करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित खात्यांकडून प्रशासकाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येत आहेत असे समजते. महानगरपालिका तसेच स्थायी समितीसह विविध समित्यांनी महानगरपालिकेच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमध्ये कोणताही फेरफार अथवा सदर प्रस्ताव रद्द करण्याबाबतचे निर्णय महानगरपालिका अस्तित्वात येईपर्यंत प्रशासक, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी घेणे उचित ठरणार नाही. विरोधकांच्या दबावाला बळी पडू नका. पालिका सभागृह आणि स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयात बदल करीत आहे. हा सभागृहाचा अवमान आहे, अशी आठवण माजी किशोरी पेडणेकर यांनी पत्राद्वारे करून दिली आहे.