महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anil Deshmukh Bail: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जामीनासाठी सीबीआय कोर्टात धाव - अनिल देशमुख जामीनासाठी सीबीआय कोर्टात

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने PMLA प्रकरणात जामीन मंजूर केल्यानंतर (Anil Deshmukh Bail) सीबीआय कोर्टामधून देखील जामीन मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे.

Anil Deshmukh
Anil Deshmukh

By

Published : Oct 5, 2022, 3:19 PM IST

मुंबई:राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने PMLA प्रकरणात जामीन मंजूर केल्यानंतर (Anil Deshmukh Bail) सीबीआय कोर्टामधून देखील जामीन मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे. देशमुख यांच्या जामीन अर्जाला अद्याप सत्र न्यायालयातून आउटलेट नंबर प्राप्त झालेला नाही आहे. 6 ऑक्टोबरला अर्जावर नंबरिंग होण्याची शक्यता आहे.

सीबीआयने केली होती अटक: माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी कथित वसुली प्रकरणाचा आरोप केला होता. या प्रकरणाचा तपास सीबीआय द्वारे करण्यात यावा अशी मागणी वकील जयश्री पाटील यांनी केली होती. त्यानंतर या प्रकरणात सीबीआयच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. एप्रिल महिन्यात अनिल देशमुख यांच्यासह या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना सीबीआयने अटक केली होती.

केवळ एकाच प्रकरणात जामीन मंजूर: सीबीआयच्या तक्रारीच्या आधारे ईडीने देशमुखांवर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र ते सीबीआय प्रकरणात सुद्धा अटकेत असल्याने त्यांना अद्याप कारागृहा बाहेर येता येणार नाही. त्यामुळेच सीबीआय प्रकरणात देखील अनिल देशमुख यांना जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. उद्या दसऱ्या निमित्त न्यायालयाला सुट्टी असल्याने 6 ऑक्टोबर रोजी अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाकडून नंबरिंग होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यातच अनिल देशमुख यांच्या वतीने सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती देखील न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काय आहे प्रकरण? :मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली होती. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.

अनिल देशमुख यांच्या विरोधात या प्रकरणातील सह आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना या प्रकरणात माफीचा साक्षीदार म्हणून अनिल देशमुख यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी सीबीआयच्या विशेष कोर्टाने मंजुरी दिली आहे. मात्र याच आरोपीच्या साक्षेवर अविश्वास असल्याचे नोंद उच्च न्यायालयाने केल्यामुळे आता या प्रकरणात सीबीआय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details