मुंबई -विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते क्वारंटाईन झाले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सांगितले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी ट्विटद्वारे केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण; झाले क्वारंटाईन - देवेंद्र फडणवीस कोरोना बातमी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते क्वारंटाईन झाले आहेत. ट्विट करून त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस हे बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. मात्र, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांनी तीन दिवस महाराष्ट्राचा दौरा केला. यात त्यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे, आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी ट्विटरवरून केले आहे.
राज्यातील या नेत्यांनाही झाला होता कोरोना -
नारायण राणे, जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अब्दुल सत्तर, सुनील केदार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, प्राजक्त तनपुरे, बच्चू कडू, मकरंद पाटील, किशोर जोरगेवार, ऋतुराज पाटील, प्रकाश सुर्वे, पंकज भोयर, माणिकराव कोकाटे, मुक्ता टिळक, वैभव नाईक, सुनील टिंगरे, किशोर पाटील, यशवंत माने, मेघना बोर्डीकर, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, चंद्रकांत जाधव, रवी राणा, अतुल बेनके, प्रकाश आवाडे, अभिमन्यू पवार, माधव जळगावकर, कालिदास कोलंबकर, महेश लांडगे, मोहन हंबरडे, अमरनाथ राजूरकर, मंगेश चव्हाण, गीता जैन, सरोज अहिरे, सदाभाऊ खोत, सुजित सिंग ठाकूर, गिरीश व्यास, नरेंद्र दराडे.
Last Updated : Oct 24, 2020, 3:19 PM IST