महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anil Deshmukh Bail Application : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी

मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात ( Special PMLA Court Mumbai ) , 100 कोटी कथित वसुली प्रकरणात ( 100 Crore Recovery Case ) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केलेला ( Anil Deshmukh Bail Application ) आहे. या संदर्भात आज सुनावणी झाली. न्यायालयाने पुढील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.

अनिल देशमुख
अनिल देशमुख

By

Published : Feb 9, 2022, 3:48 PM IST

मुंबई : 100 कोटी वसुली प्रकरणात ( 100 Crore Recovery Case ) ईडीने अटक केल्यापासून अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी ( Anil Deshmukh Bail Application ) झाली. याप्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात आली होती. त्यावेळी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ वाढवून घेतली होती. त्यानुसार आज ईडीने त्यांचे म्हणणे न्यायालयासमोर सादर ( Special PMLA Court Mumbai ) केले. त्यानुसार न्यायालयाने १४ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. वकील अनिकेत निकम यांनी याबाबत माहिती दिली आहे.

काय आहे प्रकरण?

100 कोटींच्या वसुलीचे आरोप अनिल देशमुख यांच्यावर होते. त्या प्रकरणी ईडी आणि सीबीआय यांच्याकडून चौकशी केली जात आहे. देशमुख यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली. जून, जुलै आणि ऑगस्ट 2021 या महिन्यात ईडीने विविध ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर त्यांचे सचिव संजीव पलांडे यांनाही अटक केली. तसंच कुंदन शिंदे यांनाही अटक केली.मार्च महिन्यात जेव्हा परमबीर सिंग यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आलं त्यानंतर तीन दिवसात परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला 100 कोटी रुपये दर महिन्याला बार आणि रेस्टॉरंटमधून वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं.

अनिल देशमुख यांच्याविरोधात 7 हजार पानी आरोपपत्र

100 कोटी कथित प्रकरणात तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली. यानंतर ९० पेक्षाही जास्त दिवसांपासून अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या पत्नीचा भाऊ यांनादेखील सहआरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details