महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anil Deshmukh Remand Extended : अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ - 1oo crore extortion case

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ ( Anil Deshmukh's judicial remand extended for 14-day ) झाली आहे. विशेष न्यायालयाने आज हा निर्णय दिला आहे. अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यांची 13 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे.

Anil Deshmukh Remand Extended
अनिल देशमुख

By

Published : Nov 29, 2021, 4:19 PM IST

मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे. विशेष न्यायालयाने आज हा निर्णय दिला आहे. अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यांची 13 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे.

ईडीने माजी गृहमंत्र्यांनी केली आहे अटक-

शंभर कोटी वसुली प्रकरणात ईडीने चौकशी करून माजी गृहमंत्री अनिल देशमुखयांना अटक केली आहे. अनिल देशमुख यांना 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाची कोठडी देण्यात आली आहे. परमबीर सिंग यांनी आरोप केल्यानंतर ईडीकडून देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा -Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्यावरील चौकशीसाठी एसआयटी स्थापन

सचिन वाझेने देशमुखांची भेट दिल्याची दिली कबुली-

शंभर कोटी वसुली प्रकरणाची चौकशी ( 1oo crore extortion case ) करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल आयोगाची स्थापना केली आहे. सह्याद्री अतिथीगृह अनिल देशमुख यांची शासकीय बंगला ज्ञानेश्वरी या ठिकाणी भेट झाल्याची कबुली सचिन वाझे ( Sachin Waze meeting with Anil Deshmukh ) यांनी मागील सुनावणीत दिली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -परमबीर सिंह अन् शिवसेनेचे साटेलोटे, अतुल भातखळकर यांचा आरोप

काय आहे प्रकरण?

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आलेले परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती. मात्र, वारंवार समन्स देऊन सुद्धा परमबीर सिंग चौकशीला उपस्थितीत राहत नव्हते. त्यानंतर परमबीर सिंग यांनी राज्य सरकरने सुरु केल्याल्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर चांदीवाल आयोगाने सुद्धा परमबीर सिंग यांना शेवटची संधी दिली होती.

हेही वाचा -Chandiwal Commission माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्या हजर राहण्याचे चांदीवाल आयोगाकडून समन्स

ABOUT THE AUTHOR

...view details